वणी तालुक्यातील घरफोडीचे सत्र काही केल्या थांबत नाही,बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर आहेत,घर बंद दिसले की चोरटे हमखास डाव मारणार असे चित्र सध्या वणी मध्ये निर्माण झाले आहे…
प्राप्त माहितीनुसार शहराजवळील मंगलम पार्क परिसरात निलेश ओमप्रकाश चचडा यांच्या घरी घरफोडीची घडली आहे,
ते १८ जुलैला कुटुंबासह नागपूरला गेले असता चोरट्यांनी बंद घरात आपला डाव साधला आणि जेव्हा ते २१जुलैला परत आले तेव्हा घराच्या मुख्य द्वाराचे कुलूप तुटून आढळले व तसेच बेडरूमच्या आलमारीचा लॉक ही तुटलेला आढळला,त्यांनी आलमारीची तपासणी केली असता १९ हजार रूपयांचे २ ग्रॅम सोन्याचे लॉकेट,२० हजाररोख व दुसऱ्या आलमारीतून १२ ग्रॅम सोन्याची चेन अंदाजे किंमत (१,११,०००)२८ हजार रूपयांची सोन्याचीरिंग्ज,३७ हजार रूपयांच्या ४ ग्रॅमच्या रिंग्ज,५ ग्रॅम सोन्याची अंगठी (४६०००₹)१५ ग्रॅम चांदीचीपायजेब(१७००₹),दोन चांदीची मेडल्स (३३००₹)असा एकूण २,६६,००० रूपयांचे दागिने व २० हजार रुपये रोखअसा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

निलेश चचडा यांनी या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली व पोलिसांनी बीएनस कलम३०५(ए)३३१(१)३३१(४) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे…
काही दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक गोपाळ उंबरकर यांनी नागरिकांना आवाहन केले होते की नागरिकांनी बाहेर जाताना आपल्या किमती वस्तू बॅंकेच्या लॉकर मध्ये ठेवून बाहेर जावे जेणेकरून घरफोडीची घटना घडली तर कमीतकमी नुकसान होईल…
घरफोडीच्या वारंवार होणाऱ्या घटनांनी नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे परंतु पोलिसांकडून दिलासा सध्या तरी मिळत नाही आहे…

























