शहरातील प्रसिद्ध युवा व्यावसायिक कपिल तुलसीदास जुनेजा यांची भारतीय जनता पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांच्या मान्यतेने व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली,शहराध्यक्ष ऍड.निलेश चौधरी यांनी केली.
युवा नेतृत्व, कार्यकुशलता आणि सामाजिक बांधिलकी यांचा उत्कृष्ट संगम असलेल्या कपिल तुलसीदास जुनेजा यांनीज्ञआपल्या नियुक्तीबाबत आनंद व्यक्त करत भाजप नेतृत्वाचे आभार मानले.
“सामान्य जनतेच्या , खासकरून तरूणाईच्या अडचणी व समस्या पक्षश्रेष्ठींना आणि शासन दरबारी पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

पक्षाच्या बळकटीसाठीही मी सदैव कार्यरत राहीन,असे ही ते म्हणाले.
त्यांच्या नियुक्तीनंतर विविध सामाजिक,राजकीय, व्यवसायिक व युवकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून,सर्वत्र कपिल तुलसीदास जुनेजा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…

























