तेलंगणातील दोघांसह चौघांना अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
वणी, ता. २५ जुलै — वणी पोलिसांनी पद्मावती नगरी येथील लक्ष्मी नारायण अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या वरलीमटका अड्ड्यावर धाड टाकून तेलंगणातील दोघांसह चौघांना अटक केली. या कारवाईत एकूण ₹१,५४,७००किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लक्ष्मी नारायण अपार्टमेंटच्या तिसऱ्यामजल्यावरील एका फ्लॅटवर छापा मारला. अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे:

गोपीनाथ सोमय्याजुलु बंडी (वय ६०, रा. वारंगल, तेलंगणा)
राजेंद्र यादगीरी येलगंटी (वय ५२, रा. पेगडामपल्ली, तेलंगणा)
फरदिन अतिक अहेमद (वय २४, रा. सबा कॉलनी, वणी)
स्वामी कोमराया बोक्का (वय ३६, रा. म्युचाराला, तेलंगणा)
जप्त मुद्देमालात:
२ अँड्रॉइड मोबाईल, २ जुने मोबाईल (किंमत ₹८०,०००)
२ टॅब (₹२०,०००), १ प्रिंटर (₹२०,०००)
२ कॅल्क्युलेटर (₹५००), १ लॅपटॉप (₹२५,०००)
वरली मटक्याचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या,
₹९,२०० रोख रक्कम
या सर्वांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास PSI धीरज गुल्हाने करत आहेत.
ही कारवाई SDPO किंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, PI उंबरकर साहेब यांच्या आदेशानुसार PSI धीरजगुल्हाने, PSI अंकुश वडतकर, पोकॉ मिथुन राऊत, पोकॉ मोनेश्वर खंडरे, पोकॉ गजानन कुडमेथे, पोकॉ नंदकुमारपुप्पुलवर यांच्या संयुक्त पथकाने केली.

























