सिटी हब मिडिया वणी…
“नगराध्यक्ष झालात तर पहिले काय कराल?”
वणीकरांनी तुम्हाला नगराध्यक्ष केले तर तुमचे पहिले पाच प्राधान्यक्रम काय असतील?
“वणीची सर्वात मोठी समस्या आजही पाण्याची आहे. ही समस्या अनेक वर्षे सोडवली गेली नाही. शासनाकडून मंजूर निधी असतानाही योग्य नियोजन झाले नाही, म्हणूनच माझा पहिला निर्णय वणीकरांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेला वेग देण्याचा असेल. तसेच शहरातील रस्ते, नाल्या, आणि स्वच्छता व्यवस्था सुधारण्यासाठी तातडीने विशेष पथक कार्यरत करणार आहे,” असे पायल तोडसाम ठामपणे सांगतात.
“महिला सुरक्षा, सीसीटीव्ही नेटवर्क, तरुणांसाठी रोजगार प्रशिक्षण केंद्र, आणि नागरिकांना एका खिडकीत सर्व सुविधा मिळणारी ‘स्मार्ट वणी सेवा-केन्द्र’ ही माझी पुढील प्राधान्ये असतील. वणीचा चेहरा बदलायचा असेल तर काम तत्पर आणि पारदर्शक असले पाहिजे. निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी मी वणीकरांना दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी दाखवणार आहे,” त्या म्हणतात.

























