Homeक्राइमवणी मुकुटबन मार्गावर शासनातर्फे नागरिकांसाठी मोफत जलसमाधी योजनेची सुरुवात!

वणी मुकुटबन मार्गावर शासनातर्फे नागरिकांसाठी मोफत जलसमाधी योजनेची सुरुवात!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

वणी ते मुकुटबन या ३२ किलोमीटरच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि व्यस्त मार्गावर प्रवाशांचा जीव मुठीत धरून प्रवास सुरू आहे. या मार्गावरील निर्गुडा नदीवरील पूल सध्या मृत्यूचा सांगाडा बनला असून, प्रशासकीय दुर्लक्षामुळे येथे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बांबूची मलमपट्टी, २४ तास अवजड वाहतूक!

निर्गुडा नदीवरील पुलाचा एका बाजूचा संपूर्ण कठडा (गार्डरेल) तुटून नदीत कोसळला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाने तेथे केवळ बांबू बांधून मलमपट्टी केली आहे. ही तथाकथित व्यवस्था म्हणजे प्रवाशांच्या जिवाशी सुरू असलेला खेळच आहे. सध्या निर्गुडा नदी दुथडी भरून वाहत असून, पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्यास किंवा नजर चुकल्यास एखादे वाहन थेट नदीत कोसळून चालकाला ‘जलसमाधी’ मिळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या धोकादायक पुलावरून दिवस-रात्र अवजड वाहनांची वाहतूक अविरत सुरू आहे.

खनिज निधी अरबो रुपयांचा, पण वणीकरांच्या वाट्याला खड्डे अन् धूळ!

वणी परिसरातून दरवर्षी अरबो रुपयांचा खनिज निधी जमा होतो. मात्र, एवढा निधी येऊनही वणीकरांच्या वाट्याला भकास रस्ते आणि जीवघेणे प्रदूषणच आले आहे.

पावसाळ्यात: खड्डे, चिखल आणि पाणी साचल्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप येते.

इतर दिवसांत: उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त होतात.

प्रशासन कुणाच्या बळीची वाट पाहतंय?

सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), एम एस आय डी सी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. “एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतापजनक सवाल आता नागरिक विचारत आहेत.

जनक्षोभ उसळण्याची शक्यता!

या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या आणि स्थानिकांच्या सहनशीलतेचा अंत आता झाला आहे. प्रशासनाने यावर तत्काळ ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही, तर येत्या काळात तीव्र जनक्षोभ उसळल्यास नवल वाटणार नाही, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए