Follow Us On

Wednesday, March 18, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रमाजी आमदार विश्वास नांदेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वणी–पठारपूर परिसरात शोककळा!

    माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वणी–पठारपूर परिसरात शोककळा!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…वणी 

    वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा ज्येष्ठ शिवसेना नेते विश्वास नांदेकर यांचे मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुःखद निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईहून वणी येथे आणण्यात आले. वणीतील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असता हजारो नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण करत अखेरचे दर्शन घेतले.

    यानंतर त्यांचे पार्थिव वणी येथून त्यांच्या मूळ गावी कायर पठारपूर येथे नेण्यात आले. पठारपूर येथील त्यांच्या राहत्या घरी पारंपरिक धार्मिक विधी पार पाडल्यानंतर पूर्ण शासकीय प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पुतण्याने त्यांना मुखाग्नी दिला. अंत्ययात्रेदरम्यान वणी शहरासह संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून त्यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करत होते. या वेळी संपूर्ण परिसर शोकमग्न झाला होता.

    या अंत्यसंस्कार प्रसंगी पालकमंत्री संजय राठोड, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, मनसेचे पक्षनेते राजू उंबरकर, काँग्रेस प्रदेश सचिव संजय खाडे तसेच शिवसेनेचे संघटक मंत्री विजय चोरडिया यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि गावातील हजारो नागरिक उपस्थित होते.

    विश्वास नांदेकर यांचा मोठा चाहता वर्ग होता. “शिवसेनेचा ढाण्या वाघ हरपला”, “कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ निखळला” अशा शब्दांत सर्वसामान्य जनता, कार्यकर्ते व समर्थकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. समर्थकांसाठी ते प्रेरणास्थान होते, तर वणीच्या राजकारणात त्यांनी स्वतंत्र व ठळक ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने वणीच्या राजकारणात कधीही न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

    सिटी हब मिडिया वणी… 

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
    03:44
    Video thumbnail
    ‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
    05:27
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Video thumbnail
    गावागावांतील दयनीय आरोग्य व्यवस्था,संजय निखाडे यांच्या विविध आरोग्य शिबिरातून गावकऱ्यांना दिलासा...
    05:12
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए