सिटी हब मिडिया वणी…
श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज (विदर्भ), नागपूर संस्थेच्या वतीने भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या व सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ ला दिघोरी नाक्याच्या मागे, पडोळे लॉनजवळ, नागपूर येथे भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 
या महोत्सवात 2026 चा समाज गौरव पुरस्कार यवतमाळ जिल्ह्यातील कलावंत, साहित्यिक तथा संपादक डॉ. विनोदकुमार आदे यांना प्रदान करण्यात आला.
2008 पासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तालुका ते राज्यस्तरीय प्रज्वलन या नावाने मारेगाव व वणीतही दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम राबवून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना डॉ. विनोदकुमार आदे यांनी मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनानिमित्त मारेगाव व वणी येथे विविध चालू घटकांवर डॉ. विनोदकुमार आदे यांनी. प्रबोधनात्मक पोस्टर रांगोळ्या काढून जनतेचे लक्ष वेधून जनजागृती केली आहे.
मतदान, हुंडाबळी, व्यसन, बेरोजगारी, देशभक्ती, कोरोना यावर आधारित गीते तयार करून, गाऊन, लघुचित्रपटाची ही निर्मिती केली, त्यांचा टुकार नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित असून, “अजून माझा बाप काही केल्या मरत नाही” नावाचा कथासंग्रह व “बाप” नावाचा कवितासंग्रह आणि “तडतडात” नावाचा कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे, डॉ. विनोदकुमार आदे हे सध्या वणी न्यूज एक्सप्रेस या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक असून त्यांनी शेकडो कला आत्मसात केल्या आहेत. एक उत्कृष्ट असे ग्राफिक्स डिझायनरही आहे.
चित्रकला, मूर्तिकला, हस्तकला, शिल्पकला, रांगोळी कला, गायन, लेखक, कवी, संगीतकार, गीतकार, वैज्ञानिक इत्यादी गुण त्यांच्या अंगी आहे.
कला व संशोधन या क्षेत्रासाठी हेसन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने त्यांना पीएचडी बहाल केली आहे. त्यांच्या या भरीव व समाज कार्यासाठी यंदाचा समाज गौरव पुरस्कार डॉ. विनोदकुमार आदे यांना प्रदान करण्यात आला.
श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज (विदर्भ), नागपूर संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी दशकाचे औचित्य साधून संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा इतिहास मांडणारी ‘फुललेली बाग’ ही स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. या स्मरणिकेमध्ये डॉ. विनोदकुमार आदे
यांनी लिहिलेला “माझे माहेर नवरगाव” हा लेख समाविष्ट करण्यात आला. या लेखात गावच्या आठवणी विस्तृतपणे त्यांनी मांडल्या.
त्यांच्या या लेखाची समाज बांधवांनी प्रशंशा केली.
यावेळी मंचावर चंद्रपूर येथील प्रसिद्धतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सौ. अभिलाषाताई गावतूरे, एस.व्ही.ई.टी., नागपूरचे प्राचार्य डॉ. श्री. विजय वाढई सर, गोंडपिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव निकुळे, महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूरच्या संचालिका व संत साहित्याच्या अभ्यासिका प्रा. डॉ. अलकाताई बी. झाडे, चंद्रपूरचे एम.डी. पॅथॉलॉजिस्ट व सामाजिक कार्यकर्ते डॉ. राकेश गावतूरे, नागपूरच्या माजी नगरसेविका सुनंदाताई नाल्हे, तसेच माळी वैभवचे कार्यकारी संपादक मनोहर चलपे, श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज (विदर्भ), नागपूर संस्थेचे अध्यक्ष कृष्णा महादुरे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला समाजबांधवांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने हजेरी लावली.

























