सिटी हब मिडिया वणी…
रोटरी उत्सवाच्या निमित्ताने खास रील स्पर्धेचे आयोजन…
रोटरी उत्सवाचे औचित्य साधून रोटरी क्लबच्या वतीने युवक, महिला व कुटुंबांसाठी “रोटरी उत्सव रील कॉम्पिटीशन” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रोटरीच्या सकारात्मक उपक्रमांना व उत्सवाच्या आनंदाला सर्जनशील स्वरूप देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा राबविण्यात येत आहे.
या रील स्पर्धेसाठी ७ जानेवारी २०२६ पासून रील तयार करण्यास सुरुवात करता येणार असून २५ जानेवारी २०२६ ही रील अपलोड करण्याची अंतिम तारीख आहे. स्पर्धेतील विजेत्यांना २६ जानेवारी २०२६ रोजी भव्य कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी सादर केल्या जाणाऱ्या रील्स या रोटरी उत्सव या विषयाशी संबंधित असाव्यात. रील्स क्रिएटिव्ह, सकारात्मक आणि कुटुंबासाठी योग्य (Family Friendly) असणे आवश्यक आहे. सहभागी रील्स Rotary Club Page,
Wanikar Hub,Trending Wani, Wanikar Zone Waninnews सोबत Collab करूनच अपलोड कराव्यात. विशेष म्हणजे, एका सहभागीला एकापेक्षा अधिक रील्स सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.
विजेत्यांची निवड सर्जनशीलता (Creativity), सहभाग व एंगेजमेंट (Engagement) तसेच विषयाशी सुसंगतता (Relevance) या निकषांवर करण्यात येणार आहे. त्यामुळे सहभागींसाठी आपली कल्पकता आणि सकारात्मक दृष्टिकोन मांडण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
रील स्पर्धेत सहभागासाठी किंवा अधिक माहितीसाठी खालील रोटरी सदस्यांशी संपर्क साधावा:
Rtn. शुभम मदान – 8149733710
Rtn. अंकुश भंडारी – 9404087085
Rtn. श्रेयश निखार – 8237855373
रोटरी उत्सवाचा आनंद सर्जनशीलतेतून व्यक्त करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या अनोख्या रील स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 🎉

























