सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
तुंबलेल्या नाल्याची पाहणी करताना पाय घसरून बांधकाम सभापती लवलेश लाल जखमी…
प्रभागात तुंबलेल्या नाल्याची पाहणी करताना पाय घसरून पडल्यामुळे नगर परिषदेचे बांधकाम सभापती लवलेश लाल यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभागातील नाली चोकअप झाल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने परिस्थिती पाहण्यासाठी सभापती लवलेश लाल घटनास्थळी गेले होते. नालीची पाहणी करत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले.
या अपघातात त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली. त्यांना तात्काळ स्थानिक डॉ. खापणे रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

























