Homeखेलनागपूरच्या ढोल-ताशा महासोहळ्यात वणीचा दणदणीत सहभाग; ४५०० वादक एकत्र करणार सांस्कृतिक जल्लोष!

नागपूरच्या ढोल-ताशा महासोहळ्यात वणीचा दणदणीत सहभाग; ४५०० वादक एकत्र करणार सांस्कृतिक जल्लोष!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

महाराष्ट्राच्या पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीचा भव्य नाद रविवारी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर घुमणार आहे. जनमंथन फाउंडेशनच्या वतीने ‘मंथन 4 युवा – नागपूर 2026’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात तब्बल ४५०० वादक एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

या महासोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याने कार्यक्रमाची उत्सुकता अधिक वाढली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून सहभागी होणाऱ्या ढोल-ताशा पथकांच्या सामूहिक सादरीकरणातून राज्याची लोककला, परंपरा आणि युवा शक्तीचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमात वणीच्या छत्रपती ढोल-ताशा पथकाचाही दमदार सहभाग असणार आहे. पथक प्रमुख दिपक पाऊणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वणीतील तब्बल ६० वादक नागपूरकडे रवाना होणार असून, महासोहळ्यात ते आपल्या ताल-वाद्यांच्या माध्यमातून वणीची सांस्कृतिक ओळख अधोरेखित करणार आहेत.

रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता रेशीमबाग मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. हजारो वादकांचा एकत्रित ताल, भगव्या ध्वजांची दिमाखदार उपस्थिती आणि पारंपरिक वाद्यांचा गजर यामुळे नागपूरमध्ये भव्य सांस्कृतिक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

वणीच्या ६० वादकांचा या ऐतिहासिक स्वरूपाच्या उपक्रमातील सहभाग हा वणीकरांसाठीही अभिमानाचा क्षण ठरणार आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक कलेला युवा पिढीच्या माध्यमातून नवी ऊर्जा देणारा हा महासोहळा पाहण्यासाठी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए