- मौजा गणेशपूर (ता. वणी) – गावातील मुन्ना वर्मा यांच्या वावरामधील विहिरीत एक गाय तीन दिवसांपासून अडकून होती.
एवढा मोठा प्रकार घडला असूनही ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती…
मात्र, उज्वला निब्रड यांनी ही माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवली व गौरक्षणासाठी नेहमी तत्पर असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि सदर गायीला मोठ्या प्रयत्नाने सुखरूप रित्या विहिरीबाहेर काढून निष्पाप मुक्या जनावराला जीवनदान दिले व गौरक्षणासाठी तत्पर बजरंग दलाच्या नावाला सार्थक केले…
या कार्यात बजरंग दलाच्या रोहन पारखी,
शुभम आकिनवार,
उज्वला निब्रड ,
भूषण भानारकर,
तुषार तरारे, कपिल कुंतलवार यांनी मोलाची मदत केली…

या प्रकारामुळे गावातील प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जनावरांचे प्राण वाचवण्यासाठी सामाजिक संस्थांकडून दाखवलेली तत्परता ही खर्या अर्थाने प्रेरणादायी ठरली आहे…

























