Homeमहाराष्ट्रवणी-लालगुडा मार्गावरील भीषण अपघातात एकाच कुटुंबाचा अंत — उपचारादरम्यान चिमुकली इनायाचाही मृत्यू...

वणी-लालगुडा मार्गावरील भीषण अपघातात एकाच कुटुंबाचा अंत — उपचारादरम्यान चिमुकली इनायाचाही मृत्यू…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणी-लालगुडा मार्गावरील भीषण अपघातात एकाच कुटुंबाचा अंत — उपचारादरम्यान चिमुकली इनायाचाही मृत्यू…

वणी-लालगुडा मार्गावरील जन्नत हॉटेलजवळ काल झालेल्या भीषण अपघातानंतर संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार मुलींसह वडिलांचा मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेली चिमुकली इनाया शारीक शेख हिचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, लालपुलिया परिसरातील रियाजभाई मिस्त्री (वय ५५) हे आपल्या मुलगी लियाबा (वय २०) हिला कार चालवण्याचे प्रशिक्षण देत होते. त्यांच्या सोबत मुली मायरा आणि अमिरा तसेच लहान भावाची चार वर्षांची मुलगी इनाया हीसुद्धा कारमध्ये होती. कार (MH01-AH-5700) चालवताना टर्न घेत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात लियाबा, मायरा आणि अमिरा यांचा जागीच मृत्यू झाला. आपल्या मुलींचा मृतदेह पाहून रियाजभाई मिस्त्री यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही दुःखद मृत्यू झाला.

चिमुकली इनाया गंभीर जखमी अवस्थेत होती. तिला वणी येथून प्रथम चंद्रपूर येथे, नंतर उपचारासाठी नागपूर येथील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी रात्री इनायाचाही मृत्यू झाला.

आज संध्याकाळी इनायावर स्थानिक कब्रस्तानात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल रियाजभाई आणि त्यांच्या तीन मुलींच्या अंत्यसंस्कारावेळीही परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. त्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

ही दुर्घटना वणी शहरातील अलीकडच्या काळातील सर्वांत वेदनादायी घटना ठरत असून, एकाच कुटुंबावर ओढवलेला हा अनर्थ सर्वांच्या मनाला चटका लावणारा आहे.

📍City Hub Media

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए