सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
येथील छोरिया लेआउट भागात राहणाऱ्या नीलम दीपक वर्मा (वय ३६) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्या शहरातील गाडगे महाराज चौकातील चहापत्ती व मसाल्याचे व्यापारी दीपक वर्मा यांच्या पत्नी होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पती नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर गेले होते. त्यांचा १५ वर्षांचा मुलगा भंडारा येथे शिक्षणासाठी असून १२ वर्षांची मुलगी शाळेत गेली होती. घरात कोणी नसताना नीलम यांनी वरच्या मजल्यावर नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला.घटना जवळपास दुपारी बाराच्या सुमारास घडली…
सकाळी घरकाम करणारी महिला कामावर आली असता तिच्या हा प्रकार लक्षात आला. तिने आरडाओरड केल्यानंतर शेजारी जमा झाले व कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. नीलम वर्मा काही दिवसांपासून आजारी असल्याची प्राथमिक माहिती असून, त्यांनी आजारपणाला कंटाळून हे पाऊल उचलले की अन्य काही कारण आहे, याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

























