Homeमहाराष्ट्रवणी–कोरपणा मार्गावरील सहा गावांत WCL प्रदूषणामुळे पिकांचे नुकसान; रस्ता रोकोनंतर प्रशासन...

वणी–कोरपणा मार्गावरील सहा गावांत WCL प्रदूषणामुळे पिकांचे नुकसान; रस्ता रोकोनंतर प्रशासन नमते, विजय पिदुरकरांच्या नेतृत्वात यशस्वी आंदोलन; शेतकऱ्यांना दिलासा,१ फेब्रुवारीपासून सर्वेक्षण!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

वणी–कोरपणा मार्गावरील सहा गावांमध्ये वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) च्या प्रदूषणामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, त्या नुकसानीच्या पाहणी व भरपाईची प्रक्रिया मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. याबाबत शेतकरी व ग्रामस्थांनी वारंवार निवेदने देऊन आंदोलने केली; मात्र प्रशासन व WCL कडून दखल घेतली जात नव्हती.

अखेर शेतकरी व ग्रामस्थांनी माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजप नेते विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच खांदला गावाचे सरपंच हेमंत गौरकर यांच्या पुढाकाराने वणी–कोरपणा मार्गावर खांदला गावाजवळ रस्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनाला परिसरातील अनेक गावांतील सरपंच, भाजप पदाधिकारी व ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा लाभला.

या आंदोलनात भाजप तालुकाध्यक्ष प्रदीप जेऊरकर, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष गजाननजी विधाते, भाजप महामंत्री मुकेश जुंगारे, कायर मंजूभाऊ डंभारे, तसेच मोहदा गावच्या सरपंच वर्षाताई राजूरकर, वेडाबाई गावच्या सरपंच रंजनाताई बांदूरकर, वारगावचे माजी सरपंच कैलासभाऊ धांडे, शिरपूरचे सरपंच गणेश डावले, चारगावचे सरपंच शंकर वालकुंडे, मोहदाचे उपसरपंच सचिन रासेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय कुर्ली येथील प्रफुल बांदुरकर, पाथरी खरेदी-विक्री संस्थेच्या संचालक सोनल बोर्डे, बोरगावच्या सरपंच प्रियंका कोल्हे, दीपक ताजने, देवराव कोल्हे (बोरगाव), साखरा येथील शांतारामजी उपासे तसेच शिरपूरचे जगदीश बोरपे यांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

Screenshot

आंदोलनादरम्यान WCL च्या कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांची वाहतूक पूर्णतः रोखण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यावर कोळसा भरलेले ट्रक लांबच लांब रांगेत उभे राहिले. परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, WCL च्या वाहनांव्यतिरिक्त इतर सर्वसामान्य वाहतूक – बस, लहान वाहने तसेच शेतकऱ्यांचा कापूस वाहून नेणाऱ्या मालवाहू गाड्यांना सूट देण्यात आली होती.

२२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता सुरू झालेले हे आंदोलन रात्री १० वाजेपर्यंत सुरू होते. आंदोलनाची दखल घेत प्रशासन व WCL प्रशासनाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र, जोपर्यंत प्रशासनाकडून लिखित आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी घेतली.

शेतकरी व ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे होत्या —

बाधित शेतपिकांचे तातडीने सर्वेक्षण

सर्वेक्षणानुसार योग्य नुकसान भरपाई

परिसरातील गावांमध्ये नियमित आरोग्य शिबिरे

गंभीर आजार असलेल्या ग्रामस्थांवर WCL च्या घुगूस येथील राजीव रतन रुग्णालयात उपचार

प्रदूषणामुळे शेती व गावकऱ्यांना होणारा त्रास थांबवणे

WCL च्या सर्व वाहनांना ताडपत्री बांधणे बंधनकारक करणे

वणी–कोरपणा मार्गावरील खराब व अपूर्ण रस्त्याचे तातडीने नूतनीकरण

या सर्व मागण्या मान्य करत प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतरच ग्रामस्थांनी आपले रस्ता रोको आंदोलन मागे घेतले. त्यानंतर वणी–कोरपणा मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली.

यासंदर्भात माहिती देताना विजय पिदुरकर यांनी सांगितले की,

“१ फेब्रुवारीपासून शेतपिकांचे सर्वेक्षण सुरू होणार असून नुकसान भरपाईची प्रक्रिया लवकरच राबवली जाईल. शेतकरी व ग्रामस्थांच्या हितासाठी आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहू. भविष्यात WCL कडून कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही.”

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Video thumbnail
वणीतील ऐतिहासिक वारसा टिकून राहण्यासाठी एबीवीपीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार...
02:16
Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Video thumbnail
निशुल्क जलसेवा श्री महावीर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वणी का उपक्रम…
01:00
Video thumbnail
संधी आणि वेळ आहे, जीवनदायी निर्गुडेला जीवनदान द्या वणीकरांची हाक...
04:08
Video thumbnail
शाम बिहारी का चटपटा चना जोर गरम..,
01:18
Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए