HomeAgroवणीत 'ऑपरेशन मिड नाईट' यशस्वी; शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई, २६.८० लाखांच्या मुद्देमालासह...

वणीत ‘ऑपरेशन मिड नाईट’ यशस्वी; शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई, २६.८० लाखांच्या मुद्देमालासह ३४ गोवंशांना जीवदान!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी… 

वणी परिसरात सुरू असलेल्या अवैध गोवंश तस्करीवर शिरपूर पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमुळे तब्बल २६,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ‘ऑपरेशन मिड नाईट’ अंतर्गत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत ३४ गोवंश बैलांची सुटका करण्यात आली असून ३ बैलांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  

असा रंगला थरार: नाकाबंदी अन् पाठलाग…

शिरपूर पोलिसांना १३ मे २०२६ रोजी रात्री गुप्त माहिती मिळाली होती की, वणीकडून शिरपूर रोडने एक संशयास्पद कंटेनर गोवंशाची तस्करी करत आहे. या माहितीच्या आधारे शिरपूरचे ठाणेदार सपोनि संतोष मनवर व पोलीस स्टाफने शिरपूर ते चारगाव चौक दरम्यान तात्काळ नाकाबंदी केली.  

दरम्यान, कार्यकर्त्यांनाही टीप मिळाल्याने त्यांनी पोलिसांच्या मदतीने कंटेनर अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तस्करांनी कंटेनरचा वेग वाढवून पळ काढला. पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांनी हार न मानता पाठलाग सुरू ठेवला. अखेर चारगाव चौकाजवळ अशोक लेलँड कंटेनर (क्रमांक MH 01 AG 1288) पकडण्यात पोलिसांना यश आले.  

हृदयद्रावक दृश्य: ३ बैलांचा जागीच मृत्यू…

जेव्हा पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली, तेव्हा आतले दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. कंटेनरमध्ये एकूण ३७ गोवंश बैल एकमेकांना आखूड दोरीने अत्यंत निर्दयीपणे बांधून कोंबलेले होते. श्वास घेण्यास जागा नसल्याने आणि क्रूर वागणुकीमुळे ३ बैलांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला होता. उर्वरित ३४ बैलांची पोलिसांनी सुटका केली.  

मुख्य तस्कर नागपूरचे; पोलिसांकडून गुन्हा दाखल

पोलिसांनी कंटेनरमधील चालक सरगम गुलाबसिंग धुर्वे याला ताब्यात घेतले आहे. त्याची सखोल चौकशी केली असता, ही तस्करी नागपूरचे तोसिक अहमद (रा. ताजबाग) आणि ईरफान (रा. गडचांदूर, जि. चंद्रपूर) यांच्या सांगण्यावरून केली जात असल्याची कबुली त्याने दिली.  

जप्त केलेला मुद्देमाल:

अशोक लेलँड कंटेनर: किंमत अंदाजे २०,००,००० रुपये.  

३४ जिवंत गोवंश बैल: किंमत अंदाजे ६,८०,००० रुपये.  

एकूण मुद्देमाल: २६,८०,००० रुपये.  

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ (सुधारणा २०१५), प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

‘उज्वल गौरक्षण’ मध्ये उपचार सुरू…

बचाव केलेल्या ३४ बैलांना वणी येथील उज्वल गौरक्षण संस्थेत हलवण्यात आले आहे. अनेक बैलांच्या अंगावर जखमा असल्याने पशुवैद्यकीय रवि राठोड यांच्या पथकाद्वारे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.  

ही आहे ‘टीम शिरपूर’ ज्यांनी ही कामगिरी केली:

सदर कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, आणि वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली:  

सपोनि संतोष मनवर (ठाणेदार, शिरपूर)  

पोउपनि धीरज गुल्हाने  

सा.पोहवा इक्बाल शेख  

पोहवा प्रशांत झोड  

पोहवा अविनाश बानकर  

पोकॉं मंगेश सलाम  

पोकॉं विजय फुलुके  

पोकॉं किरण दासरवार  

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए