सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
नाव ही अक्षय आणि ग्राहकांचा विश्वास ही अक्षय…

सणासुदीच्या काळात बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर विविध प्रकारच्या मोफत भेटवस्तूंचा भडिमार सुरू असतो. मात्र, याच स्वस्त गिफ्ट्सच्या नादात अनेकदा सामान्य ग्राहकांच्या माथी कमी दर्जाचे साहित्य मारले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सुरुवातीला फायद्याची वाटणारी ही खरेदी नंतर ग्राहकांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. वस्तू लवकर खराब होणे, वॉरंटी न मिळणे आणि दुरुस्तीचा खर्च यामुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे अशा काळात केवळ मोफत वस्तूंकडे न बघता, अधिकृत बिल, खरी गॅरंटी-वॉरंटी आणि विश्वासाला प्राधान्य देऊनच खरेदी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
ग्राहकांच्या याच विश्वासावर गेल्या अनेक वर्षांपासून वणी शहरातील नामांकित ‘अक्षय एंटरप्रायझेस’ सातत्याने काम करत आहे. कोणत्याही प्रकारच्या भ्रामक जाहिराती किंवा दिखाऊ फंद्यांवर अवलंबून न राहता, थेट ग्राहकांना उच्च दर्जाचे मूळ ब्रँडेड साहित्य उपलब्ध करून देण्यावर या दालनाचा भर राहिला आहे.
यंदाच्या गौरी-गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अक्षय एंटरप्रायझेसने ग्राहकांसाठी विशेष सवलतींची घोषणा केली आहे. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, होम थिएटर, मिक्सर यांसह सर्वच प्रमुख घरगुती उपकरणांवर २०% ते ४५% पर्यंतची भव्य सूट थेट दिली जात आहे.
वर्षा कपाट आणि वॉशिंग मशीनवर उपयुक्त भेट…
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसोबतच संपूर्ण वणी परिसरात केवळ अक्षय एंटरप्रायझेसकडे उपलब्ध असणारी ‘वर्षा कंपनीची अलमारी (कपाट)’ सध्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. आधुनिक डिझाइन, उत्तम फिनिशिंग आणि दीर्घकाळ टिकणारी मजबुती यामुळे लग्नकार्यात किंवा खास प्रसंगी भेट देण्यासाठी ही एक आदर्श निवड ठरत आहे.
सणासुदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी वर्षा कपाटाच्या खरेदीवर ग्राहकांना एक उपयुक्त ट्रॉली बॅग मोफत दिली जात आहे. याशिवाय फ्रंट लोड वॉशिंग मशीनची खरेदी केल्यास त्यावरही ग्राहकांना एक दर्जेदार ट्रॉली बॅग पूर्णपणे मोफत दिली जात आहे.
सणासुदीच्या खरेदीत पैशांचे योग्य मूल्य मिळावे यासाठी ग्राहकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता, वस्तू स्वतः तपासून, खात्री करूनच खरेदी करावी, असे आवाहन अक्षय एंटरप्रायझेसकडून करण्यात आले आहे.

























