सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
बच्चूभाऊ कडूंचा वादळी दौरा! यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्रशासनाची धांदल उडणार; शिवसेनेच्या (शिंदे गट) या तीन शिलेदारांच्या मेहनतीला यश! जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन…
जनतेच्या, शेतकऱ्यांच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी ‘प्रहार’चे प्रमुख मा. श्री. बच्चूभाऊ कडू यांचा २ दिवसीय झंझावाती दौरा उद्या, ८ ऑक्टोबरपासून वणी विभागातून सुरू होत आहे. यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागांत धडकणाऱ्या या दौऱ्यामुळे स्थानिक प्रशासनाची मोठी धांदल उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, हा महत्त्वपूर्ण दौरा या भागात आयोजित व्हावा, या भागातील शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे वास्तव चित्र थेट बच्चूभाऊंसमोर यावे आणि सर्वसामान्यांना न्याय मिळावा, यासाठी शिवसेना (शिंदे गट) च्या प्रमुख नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून अफाट मेहनत घेतली आहे.
शिवसेनेच्या ‘या’ ३ शिलेदारांचे योगदान आणि कौतुक!
या दौऱ्याच्या यशस्वी नियोजनामागे आणि परिसरातील परिस्थिती बच्चूभाऊंपर्यंत पोहोचवण्यात शिवसेनेच्या (शिंदे गट) तीन खंद्या नेत्यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली आहे:
१. चंद्रकांत घुगुल (विधानसभा समन्वयक, शिवसेना – शिंदे गट)
२. धीरज लता नारायणराव राजूरकर (उप तालुकाप्रमुख, शिवसेना – शिंदे गट)
३. अनिल कमलबाई गंगाराम राजूरकर (उप तालुकाप्रमुख, शिवसेना – शिंदे गट)
शेतकऱ्यांचे प्रश्न असोत की प्रकल्पग्रस्तांच्या वेदना, या तिन्ही नेत्यांनी सदैव जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पाठबळ दिले आहे. पक्षासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी नेहमीच झटणाऱ्या या नेत्यांनी बच्चूभाऊ कडूंना स्थानिक परिस्थितीची संपूर्ण जाणीव करून देण्यात आणि हा दौरा घडवून आणण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
उद्यापासून सुरू होणाऱ्या संपूर्ण दौऱ्यात हे तिघेही नेते बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत खंबीरपणे उपस्थित राहणार आहेत. या तिघांच्या अविरत मेहनतीमुळेच आता शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांना हक्काचा न्याय मिळेल, अशी दृढ आशा निर्माण झाली असून, सर्व स्तरातून या तिघांच्या मेहनतीचे आणि तडफदार नेतृत्वाचे कौतुक होत आहे.
दौऱ्याचे प्रमुख मुद्दे व अजेंडा:
हा दौरा विशेषतः शेतकरी, कामगार आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आयोजित करण्यात आला आहे:
* पुनर्वसन व शेतीचा योग्य मोबदला
* कोळसा साठा गैरव्यवहार व वाढते प्रदूषण
* जड वाहतूक आणि अपघातांची समस्या
* स्थानिक कामगारांच्या समस्या व रोजगाराचा प्रश्न
दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक:
दिवस १: गुरुवारी, ०८/१०/२०२६ (यवतमाळ व चंद्रपूर जिल्हा)
* सकाळी ११:०० वा. – वणी: WCL (बोरगाव, जुनाड, भालर)
* दुपारी १२:०० वा. – नीलजई: जी.आर.एन. कंपनी (राजेंद्र दवस उपोषण स्थल)
* दुपारी ०१:०० वा. – घुग्घुस: कारगिल चौक (कोळसा साठा, ४० लाखांची गाडी घटना)
* दुपारी ०२:०० वा. – साखरा: मुंगोली, कोलगाव, पैनगंगा खाणी (प्रदूषण, जड वाहतूक, बेरोजगारी)
* दुपारी ०३:०० वा. – गाडेगाव (ता. कोरपना): नवीन खदान, शेती मोबदला, पुनर्वसन
* दुपारी ०४:३० वा. – साखरी (ता. राजुरा): प्रदूषण, जड वाहतूक व अपघात समस्या
* संध्याकाळी ०६:०० वा. – बल्लारपूर: प्रदूषण, जड वाहतूक
* मुक्काम: चंद्रपूर
दिवस २: शुक्रवारी, ०९/१०/२०२६ (चंद्रपूर जिल्हा)
* सकाळी ११:०० वा. – चंद्रपूर: दुर्गापूर, पडमापूर, किटाळी, तिरवंजा (पुनर्वसन, शेतकरी व बेरोजगारी प्रश्न)
* दुपारी ०१:०० वा. – भद्रावती: पुनर्वसन, शेतकरी व प्रदूषण समस्या
* दुपारी ०३:०० वा. – माजरी (ता. वरोरा): माजरी, नागलोण, एकोणा (प्रकल्पग्रस्त, प्रदूषण व जड वाहतूक)
जनतेच्या प्रश्नांवर थेट एल्गार पुकारणाऱ्या बच्चूभाऊंच्या या दौऱ्यामुळे स्थानिक जनतेमध्ये मोठा उत्साह असून, समस्यांचे तात्काळ निराकरण होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

























