आज शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावाढदिवसानिमित्त विविध स्तरांमधून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर वणी येथील सामाजिककार्यकर्ते उमेश पोद्दार यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
उमेश पोद्दार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, “मा. उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी एकदृढ नेतृत्व आहेत. त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी व लोकहितासाठी केलेले कार्य प्रेरणादायक आहे. त्यांनादीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व यशस्वी राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!”
उद्धव ठाकरे यांचा साधेपणा, विचारपूस करणारी वृत्ती आणि कार्यक्षम नेतृत्व या गुणांमुळे ते सर्वसामान्य जनतेच्यामनात विशेष स्थान राखून आहेत. अशा या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी शुभेच्छादेऊन आपला स्नेह व्यक्त केला आहे.


























