HomeAgroकापूस-तुरीच्या आडून सुरू असलेला गांजा शेतीचा गोरखधंदा उघडकीस; शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई,...

कापूस-तुरीच्या आडून सुरू असलेला गांजा शेतीचा गोरखधंदा उघडकीस; शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई, १.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

शेतातील खरीप पिकांच्या आडून गांजाची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्याला शिरपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मौजा कायर शिवारातील एका शेतातून तब्बल पावणेदोन लाख रुपये किमतीचा १८.५८० किलो वजनाचा हिरवा गांजा हस्तगत करण्यात आला असून, या कारवाईने अंमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. सुखदेव लेतु आत्राम (वय ५० वर्षे, रा. सैदाबाद) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.  गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई…शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ व गांजा विक्रीविरोधात विशेष शोधमोहीम राबवली जात आहे. या दरम्यान, सैदाबाद येथील सुखदेव आत्राम हा कायर शिवारातील स्वतःच्या शेतात कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये छुप्या पद्धतीने गांजाची लागवड करत असल्याची पक्की माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. इतकेच नव्हे, तर विक्रीसाठी काही झाडे उपटून शेतातच ठेवली असून उर्वरित झाडेही तोडण्याच्या तयारीत असल्याची खबर पोलिसांच्या हाती आली होती.  

१२७ झाडे उपटली; १ लाख ८५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त…माहितीची खातरजमा होताच पोलीस पथकाने पंचांसह थेट कायर शिवारातील संशयित शेतात धाड टाकली. शेतात झाडाझडती घेतली असता, कापूस व तुरीच्या झाडांमध्ये लपवून लावलेली गांजाची १२७ झाडे आढळून आली. पोलिसांनी तातडीने ही झाडे जप्त केली असून, त्यांचे एकूण वजन १८.५८० किलोग्रॅम भरले. बाजारभावानुसार या गांजाची अंदाजे किंमत १ लाख ८५ हजार ८०० रुपये इतकी आहे. पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवणार: पोलिसांचे आवाहन…परिसरात अशा प्रकारे छुप्या पद्धतीने गांजाची शेती, विक्री किंवा इतर अंमली पदार्थांची तस्करी सुरू असल्यास नागरिकांनी तात्काळ शिरपूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणेदारांनी केले आहे. माहिती पुरवणाऱ्या नागरिकाचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, अशी ग्वाहीही पोलिसांनी दिली आहे.  

या पथकाने बजावली कामगिरी…सदर यशस्वी कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शिरपूरचे ठाणेदार सपोनि संतोष मनवर यांच्या नेतृत्वात पोउपनि धीरज उल्हाणे, पोलीस हवालदार इकबाल शेख, सूरज साबळे, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर दराडे, दिपक वाकडे, अनुप फुलुके, विजय फुलुके, प्रफुल नाईक तसेच होमगार्ड पथकाने ही कामगिरी केली.  

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
एक एक रूपया जमा करून करण्यात आला जैताई मंदिराचा जीर्णोद्धार...
02:36
Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए