Homeमहाराष्ट्रवणी नगरपरिषद निवडणूक : भाजपचा आक्रमक घरोघरी प्रचार, ‘ट्रिपल इंजिन’च्या विकासाचा नारा!

वणी नगरपरिषद निवडणूक : भाजपचा आक्रमक घरोघरी प्रचार, ‘ट्रिपल इंजिन’च्या विकासाचा नारा!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगात येत असताना वणीमध्ये भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचाराला सुरुवात केली आहे. कमळ फुलवण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आणि शहराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या नेतृत्वात भाजपची संपूर्ण टीम गल्लोगल्ली, घराघरातून मतदारांशी थेट संवाद साधत आहे. प्रचाराचे दिवस कमी असल्याने भाजपने आपल्या मोहिमेची गती आणखी वाढवली आहे.

भाजपचे सर्व प्रमुख नेते अक्षरशः पायात भिंगरी झाल्यासारखे वणीच्या प्रत्येक वॉर्डातील प्रत्येक गल्ल्यांत फिरत आहेत. मतदारांशी थेट संवाद साधून “विकासाला मत द्या, भाजपला मत द्या” असा संदेश ते देत आहेत.केद्रांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक पातळीवर वणी नगरपरिषदेवर भाजप सत्तेत आली तर ट्रिपल इंजिन सरकार वणीचा विकास वेगाने रुळावर आणेल, असा ठाम विश्वास भाजप नेते मतदारांना देत आहेत.

Screenshot

भाजपच्या कार्यकाळात झालेली विकासकामे, मूलभूत सुविधांतील सुधारणा आणि प्रशासनातील बदल यांची उजळणी करत भाजपचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार स्वतः लोकांपर्यंत पोहोचत आहेत. “वणीचा सर्वांगीण विकास केवळ भाजपच करू शकते,” असा ठाम संदेश देत ते विकासाचीच भाषा मांडत आहेत.

भाजपच्या या डोअर-टू-डोअर मोहिमेला सर्व प्रभागांमध्ये उल्लेखनीय असा नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी पक्षाला उत्स्फूर्त साथ मिळत आहे. प्रभागातील भाजपचे उमेदवारही घराघरात जाऊन मतांची जोडी समोर करत आहेत, तर मतदारही त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

यामुळेच मागील सत्तेपेक्षाही मोठा बहुमत भाजप यंदा मिळवेल, असा दावा भाजप नेते आत्मविश्वासाने करत आहेत. मतभेद आणि मनभेद विसरून सर्व नेते एका ध्येयाने—नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याच्या—तयारीत जुटले आहेत.

सध्या निवडणूक प्रचारात भाजप इतर पक्षांपेक्षा पुढे असल्याचे वातावरण वणीभर जाणवत असून, आक्रमक शैलीतील हा प्रचार पुढील दिवसांत आणखी तापणार असल्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए