Homeमहाराष्ट्रवणी नगरपालिका निवडणूक 2025: प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज...

वणी नगरपालिका निवडणूक 2025: प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज अब्दुल सत्तार उर्फ टापू यांचा दणदणीत विजय!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

वणी नगरपालिका निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या अब्दुल हफीज अब्दुल सत्तार उर्फ टापू यांनी तब्बल 200 पेक्षा अधिक मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. अनेक प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना पराभूत करत टापू यांनी हा विजय मिळवला असून, हा निकाल वणी शहराच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.

टापू यांचे मतदान चिन्ह ‘बाल्टी (बकेट)’ होते. जनतेने आपल्या मतांच्या जोरावर ही बाल्टी पूर्णपणे भरून टापू यांच्यावर विश्वास व्यक्त केला. विजयानंतर टापू यांनी प्रभागातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानले. “जनतेच्या समस्या म्हणजेच माझ्या वैयक्तिक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी मी नेहमी तत्पर राहीन. जनता मला कधीही भेटू शकते,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसह विविध प्रश्नांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल. प्रशासनाने दखल न घेतल्यास प्रसंगी आंदोलनाचा मार्गही स्वीकारला जाईल, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. सर्व समाज व सर्व धर्मातील जनतेने दिलेले प्रेम व विश्वास हेच आपले बळ असल्याचे सांगत, हे ऋण आपण नक्कीच फेडू, असा विश्वास टापू यांनी व्यक्त केला.

प्रचाराच्या काळात प्रभाग क्रमांक 9 मधील निवडणूक चुरशीची ठरली होती. विद्यमान आमदारांच्या काही वादग्रस्त वक्तव्यांनंतर टापू यांच्या प्रचाराला अधिक गती मिळाली आणि शेवटी त्यांनी विजयाची फिनिशिंग लाईन गाठली. या विजयामुळे प्रभाग क्रमांक 9 मधील जनतेला आता विकासाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

विजयानंतर टापू यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला. अनेक मान्यवर व नागरिकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विशेषतः शेख समीर शेख रफीक, खुर्शीद हुसैन आबिद हुसैन, राजुभाऊ अडकिने आणि सैयद शाहरुख यांनी अब्दुल हफीज अब्दुल सत्तार उर्फ टापू यांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

टापू यांना निवडून आणण्यात त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असून, त्यांनी दिवस-रात्र एक करून घरोघरी जाऊन प्रचार केला. मतदारांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे हा विजय शक्य झाला, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. एकूणच, प्रभाग क्रमांक 9 मधील हा निकाल वणी नगरपालिका निवडणूक 2025 मधील महत्त्वाचा व लक्षवेधी निकाल ठरला आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Video thumbnail
वणी का नाम दुनिया में रोशन किया! विधी बाजोरिया बनीं पहली महिला पायलट | Success Story...
10:09
Video thumbnail
वणीतील गोंडकालीन ऐतिहासिक विहिरीचे रहस्य! खजुराहो सारख्या दुर्मिळ प्रतिमा | Wani History...
18:23
Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Video thumbnail
वणीतील ऐतिहासिक वारसा टिकून राहण्यासाठी एबीवीपीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार...
02:16
Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Video thumbnail
निशुल्क जलसेवा श्री महावीर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वणी का उपक्रम…
01:00
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए