Homeक्राइमआंतरराज्यीय अवैध गुटखा तस्करीवर यवतमाळ पोलिसांची मोठी कारवाई; ६५.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त!

आंतरराज्यीय अवैध गुटखा तस्करीवर यवतमाळ पोलिसांची मोठी कारवाई; ६५.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या अवैध गुटखा तस्करीविरोधात यवतमाळ पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत आंतरराज्यीय गुटखा तस्करी करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल ६५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या आदेशानुसार अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत होती. त्यानुसार दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ उपविभाग पांढरकवडा वणी पथकाला गुप्त माहिती मिळाली की तेलंगणा राज्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून पांढरकवडाकडे येणाऱ्या UP-94-AT-2305 क्रमांकाच्या आयशर वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित पान मसाला व तंबाखू वाहतूक केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून सदर वाहन थांबवले असता वाहनाची झडती घेतली. झडतीदरम्यान वाहनामध्ये विविध कंपन्यांचा सुगंधित पान मसाला व SR-1 Sended Tambaccu असा एकूण ४५,९२,०००/- रुपयांचा माल आढळून आला. तसेच वापरातील मोबाईल (किंमत अंदाजे ६,०००/- रुपये) आणि आयशर वाहन (किंमत अंदाजे २०,००,०००/- रुपये) असा एकूण ६५,९८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी वाहन चालक

मोहन सियाराम यादव (वय २६ वर्षे, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. पिपोड, ता. पिपोड, जि. शिपुरी, मध्यप्रदेश)

बुद्धा बाबूसिंग परिहार (वय ३७ वर्षे, व्यवसाय – मजुरी, रा. अमोला थाना, ता. घसारी, जि. शिपुरी, मध्यप्रदेश)

यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक योरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश बवरे, सपोनि दत्ता पेंढकर, पोउपनि धनराज ढाके, पोउपनि गजानन राजामल, पोहवा सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिठुरकर, पोशी सलमान शेख, चापोशी नरेश राऊत व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

पुढील तपास पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे सुरू असून अवैध गुटखा तस्करीच्या साखळीचा अधिक तपास केला जात आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Video thumbnail
वणीतील ऐतिहासिक वारसा टिकून राहण्यासाठी एबीवीपीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार...
02:16
Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Video thumbnail
निशुल्क जलसेवा श्री महावीर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वणी का उपक्रम…
01:00
Video thumbnail
संधी आणि वेळ आहे, जीवनदायी निर्गुडेला जीवनदान द्या वणीकरांची हाक...
04:08
Video thumbnail
शाम बिहारी का चटपटा चना जोर गरम..,
01:18
Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए