Homeमहाराष्ट्रनिवडणूक संपताच भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उरकुडे जनतेच्या सेवेत सक्रिय; वणीतील पाणीपुरवठ्याची सविस्तर...

निवडणूक संपताच भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उरकुडे जनतेच्या सेवेत सक्रिय; वणीतील पाणीपुरवठ्याची सविस्तर माहिती मागवली!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मीडिया वणी…

नगरपालिका निवडणूक संपताच भाजपचे प्रभाग क्रमांक ३ मधील नवनिर्वाचित नगरसेवक लक्ष्मण महादेव उरकुडे यांनी जनतेच्या सेवेसाठी तत्काळ कामाला सुरुवात केली आहे. रोज जनतेशी थेट संपर्क साधत, प्रभागासह संपूर्ण वणीकर नागरिकांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यावर त्यांनी भर दिला आहे.

आज त्यांनी वणी शहरातील पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्यासमोर मांडत लेखी निवेदन सादर केले. हे निवेदन मुख्याधिकारी, नगर परिषद वणी यांना देण्यात आले असून, शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती काय आहे याची सविस्तर व अधिकृत माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनातील ठळक मागण्या

नगरसेवक लक्ष्मण उरकुडे यांनी निवेदनात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत —

▪ मौजा रांगणा व निर्गुडा नदी येथून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची सविस्तर माहिती

▪ एकूण पाईपांची संख्या

▪ पाईपलाईनवरील एअर व्हॉल्व्ह व गेट व्हॉल्व्हची संख्या

▪ पाण्याच्या टाक्यांपासून शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची माहिती

▪ कोणत्या भागाला किती दिवसाआड व कोणत्या वेळेत पाणीपुरवठा होतो

▪ तसेच संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेचा नकाशा (मॅप)

देण्याची स्पष्ट मागणी केली आहे.

प्रशासनाची तात्काळ दखल

मुख्याधिकाऱ्यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेत संबंधित अधिकारी व ठेकेदारांना पाचारण केले. यावेळी नगरसेवक लक्ष्मण उरकुडे यांच्यासमोर वणीतील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती मांडण्यात आली. सध्या वणीतील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन जुनी असून नवीन पाईपलाईनचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

प्रशासनाकडून येत्या एक ते दोन वर्षांत वणीकर नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मात्र सध्या पाणीसाठा मर्यादित असल्याने काही दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

नागरिकांच्या समस्यांवर ठाम भूमिका

नगरसेवक लक्ष्मण उरकुडे यांनी यावेळी स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, नागरिकांच्या पाणीपुरवठ्याच्या समस्या लवकरात लवकर दूर करण्यात याव्यात, तसेच नागरिकांना स्वच्छ, दुर्गंधमुक्त व आरोग्यदायी पाणी मिळावे, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात.

नगरपालिकेतील शिस्तीवरही लक्ष

दरम्यान, कालच नगरपालिकेतील काही कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याबाबत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेत आज नगरपालिकेतील कर्मचारी वेळेवर हजर राहून जनतेच्या सेवेत कार्यरत असल्याचे चित्र दिसून आले.

निवडणूक संपताच जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या नगरसेवक लक्ष्मण उरकुडे यांच्या भूमिकेचे वणीकर नागरिकांकडून स्वागत व कौतुक होत आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Video thumbnail
वणीतील ऐतिहासिक वारसा टिकून राहण्यासाठी एबीवीपीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार...
02:16
Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Video thumbnail
निशुल्क जलसेवा श्री महावीर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वणी का उपक्रम…
01:00
Video thumbnail
संधी आणि वेळ आहे, जीवनदायी निर्गुडेला जीवनदान द्या वणीकरांची हाक...
04:08
Video thumbnail
शाम बिहारी का चटपटा चना जोर गरम..,
01:18
Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए