Homeक्राइम२०२५ मध्ये वणी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; गुन्हे उघडकीस आणण्यात मोठे यश!

२०२५ मध्ये वणी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; गुन्हे उघडकीस आणण्यात मोठे यश!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

वणी पोलीस स्टेशन अंतर्गत सन २०२५ अखेर एकूण ७८५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, त्यापैकी बहुतांश गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना लक्षणीय यश मिळाले आहे. नोंद झालेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये खूनचे ६, खुनाचा प्रयत्न २, दरोडा १, जबरी चोरी १, घरफोडी १९, चोरी ७१, मारहाणीचे ६३ तसेच प्राणांतिक अपघाताचे ३५ गुन्हे समाविष्ट आहेत.

याशिवाय दारूबंदीचे ६७, जुगाराचे १०८ तर इतर स्वरूपाचे ४४९ गुन्हे दाखल झाले आहेत. कायद्यानुसार भाग १ ते ५ अंतर्गत एकूण ३०० गुन्हे नोंदवले गेले असून त्यापैकी २४७ गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून ते उघडकीस आणण्यात आले आहेत. भाग ६ अंतर्गत ४८४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

घरफोडीच्या १९ प्रकरणांपैकी १० प्रकरणांचा यशस्वी छडा लावण्यात आला असून, चोरीस गेलेल्या ४३ लाख ७३ हजार ८१७ रुपयांच्या मुद्देमालापैकी १६ लाख ३१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच चोरीच्या ७१ गुन्ह्यांपैकी ३६ गुन्हे उघडकीस आले असून, चोरीस गेलेल्या १ कोटी ६ लाख ९६ हजार २०६ रुपयांपैकी ७४ लाख ७२ हजार ३५६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

मालमत्तेसंबंधी गुन्ह्यांमध्ये एकूण सुमारे ६३ टक्के मुद्देमाल परत मिळवण्यात वणी पोलिसांना यश आले आहे. वर्षअखेरीस गुन्हे प्रलंबिततेच्या आकडेवारीनुसार भाग १ ते ५ मधील ३०० गुन्ह्यांपैकी केवळ ३१ गुन्हे तपासाधीन असून, हे प्रमाण अवघे १०.३३ टक्के आहे.

गुन्हे नियंत्रण, जलद तपास आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात वणी पोलीस स्टेशनने २०२५ मध्ये प्रभावी कामगिरी केल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Video thumbnail
वणीतील ऐतिहासिक वारसा टिकून राहण्यासाठी एबीवीपीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार...
02:16
Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Video thumbnail
निशुल्क जलसेवा श्री महावीर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वणी का उपक्रम…
01:00
Video thumbnail
संधी आणि वेळ आहे, जीवनदायी निर्गुडेला जीवनदान द्या वणीकरांची हाक...
04:08
Video thumbnail
शाम बिहारी का चटपटा चना जोर गरम..,
01:18
Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए