Homeअंतरराष्ट्रीयवणीत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; २.३० लाखांच्या मुद्देमालासह दोन तस्करांना बेड्या!

वणीत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; २.३० लाखांच्या मुद्देमालासह दोन तस्करांना बेड्या!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…

यवतमाळ जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी छेडलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित ‘एमडी’ (मेफेड्रोन) ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोन अट्टल तस्करांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ३० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहितीवरून रचला सापळा…

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी परिसरात गस्तीवर असताना त्यांना खात्रीशीर खबर मिळाली की, एक इसम ड्रग्जची विक्री करण्यासाठी देशमुख वाडी परिसरातील बस स्थानकाच्या मागील रस्त्यावर येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने या भागात वेढा घातला आणि दबा धरून बसले.

काही वेळातच तिथे एक विना क्रमांकाची काळी मोपेड आली. पोलिसांनी संशयावरून दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे घातक ‘एमडी’ ड्रग्ज आढळून आले.

अटक केलेले आरोपी…

१. राहुल दिलीप ठाकूरवार (वय ४० वर्षे, रा. लायन्स स्कूल जवळ, वणी)

२. प्रितम लिलाराम केशवाणी (वय ४४ वर्षे, रा. गुरुनानक नगर, सिंधी कॉलनी, वणी)

जप्त केलेला मुद्देमाल…

पोलिसांनी आरोपींकडून खालील वस्तू हस्तगत केल्या आहेत:

२१ ग्रॅम १८ मिलिग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज (किंमत १,९७,०८० रुपये)

रोख रक्कम, मोबाईल फोन आणि विना क्रमांकाची मोपेड गाडी.

एकूण मुद्देमाल: २,३०,४४० रुपये.

पोलीस कारवाई आणि पथक…

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत सहभागी असलेले अधिकारी व कर्मचारी खालीलप्रमाणे आहेत:

सतिश चवरे (पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ)

गोपाल उंबरकर (पोलीस निरीक्षक, पो.स्टे. वणी)

दत्ता पेंढकर (सपोनि)

धनराज हाके (पोउपनि)

सुनील खंडागळे (पोहकॉ)

सुधिर पांडे (पोहकॉ)

सुधिर पिदुरकर (पोहकॉ)

निलेश निमकर (पोहकॉ)

सलमान शेख (पोकॉ)

रजनिकांत मडावी (पोकॉ)

सतिश फुके (चपोना)

तसेच एमडी ड्रग्सची तपासणी करण्याकरिता यवतमाळ वरून फॉरेन्सिक लॅबचे तज्ञ ही बोलवण्यात आले होते.त्यांनी नमुने गोळा करून नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी घेतले आहे…

 

या सर्वांच्या चोख कामगिरीमुळे वणीतील ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना पुढील कारवाईसाठी वणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

“जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू दिले जाणार नाहीत. विशेषतः तरुणाईला उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रग्ज तस्करांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील.”

            — पोलीस प्रशासन, यवतमाळ… 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए