Homeमहाराष्ट्रअस्तित्वाचा लढा: मूळ 'निलजई' ग्रामस्थांचा परप्रांतीय व बाहेरील हस्तक्षेपाविरोधात एल्गार!

अस्तित्वाचा लढा: मूळ ‘निलजई’ ग्रामस्थांचा परप्रांतीय व बाहेरील हस्तक्षेपाविरोधात एल्गार!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

 २००६ च्या विस्थापनानंतर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या निलजई येथील मूळ प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारावर आता बाहेरील मंडळी डल्ला मारत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. राजकीय दबावाचा वापर करून स्थानिकांचा हक्क हिरावणाऱ्या खासगी कंपन्या आणि प्रशासनाविरोधात आता निलजई ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

संघर्षातून उभे राहिलेले ‘निलजई’…

२००६ मध्ये जेव्हा निलजई गावाचे पुनर्वसन झाले, तेव्हा ९०% लोकांनी मोबदला घेऊन इतरत्र स्थलांतर केले. मात्र, अवघ्या ५० कष्टकरी कुटुंबांनी “आपले गाव नकाशावर जिवंत ठेवू” या जिद्दीतून निलजईची पुनर्स्थापना केली. सर्व जमीन कोळसा खाणीत (WCL) गेल्यामुळे रोजगाराचे कोणतेही साधन नसताना, या मजुरांनी ५-६ वर्षे अत्यंत हालाखीत काढली.

प्रकल्पग्रस्तांच्या घामावर ‘बाहेरच्यांचे’ अतिक्रमण?

अलीकडच्या काळात WCL च्या माती उपसा (OB Removal) कामासाठी खासगी कंपन्या गावात दाखल झाल्या. जेव्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, तेव्हा जे लोक गाव सोडून गेले होते किंवा जे गावाबाहेरील आहेत, त्यांनी राजकीय वजन वापरून या कंपन्यांमध्ये शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ज्यांनी गाव वाचवण्यासाठी वनवास भोगला, त्या मूळ प्रकल्पबाधित मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

प्रशासनाला धरले धारेवर…

आपल्या हक्काचा रोजगार हिरावला जात असल्याचे लक्षात येताच, गावातील आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी कंपनी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन केले. “आमचा हक्क, आमचा रोजगार” अशी गर्जना करत ग्रामस्थांनी कंपनीला धारेवर धरले. जोपर्यंत मूळ गावकरी आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

आंदोलनात प्रमुख उपस्थिती:

या आंदोलनाचे नेतृत्व माजी सरपंच श्री. मंजूभाऊ भा. डंभारे यांनी केले. यावेळी सरपंच सुचीता रा. टेकाम, प्रशांत निंदेकर, माजी उपसरपंच अनिलभाऊ स. कोत्तावार, सौ. जयमालाताई नं. दर्वे, संजयभाऊ जांभुळकर यांच्यासह सर्व निलजई ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“आम्ही आमचे गाव वाचवले, जमीन दिली आणि आता हक्काचा रोजगारही देणार नाही का? बाहेरच्यांचा राजकीय दबाव नीलजईच्या मातीत चालणार नाही.” > — ग्रामस्थ, निलजई

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए