Homeमहाराष्ट्रसिटी हब मिडिया इम्पॅक्ट: बातमी प्रसिद्ध होताच वाहतूक पोलीस ॲक्शन मोडमध्ये; रस्त्यात...

सिटी हब मिडिया इम्पॅक्ट: बातमी प्रसिद्ध होताच वाहतूक पोलीस ॲक्शन मोडमध्ये; रस्त्यात अडथळा ठरणारी ‘ती’ चौकी अखेर परत आपल्या जागेवर!!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

वणी-यवतमाळ राज्य महामार्गावर अपघाताला निमंत्रण देणाऱ्या त्या लोखंडी पोलीस चौकीची दखल अखेर प्रशासनाने घेतली आहे. ‘सिटी हब मिडिया’ ने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर,वाहतूक विभागाने तत्काळ हालचाली करत ती चौकी रस्त्यावरून हटवून पूर्ववत सुरक्षित जागी हलवली आहे. यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून संभाव्य अपघाताची भीती आता टळली आहे.

नेमका काय होता विषय?

काही दिवसांपासून वणी-यवतमाळ रोडवरील साईबाबा मंदिराजवळ असलेली वाहतूक पोलिसांची चौकी घसरत-घसरत चक्क रस्त्याच्या मध्यभागी आली होती. राज्य महामार्ग असल्याने या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वर्दळ असते. ही चौकी केवळ अडथळाच नव्हती, तर रात्रीच्या वेळी वाहनधारकांसाठी जीवघेणा सापळा ठरू शकत होती. एकीकडे सामान्य नागरिकांच्या पार्किंगवर दंडात्मक कारवाई करणारे पोलीस स्वतःच्या चुकीच्या जागी असलेल्या चौकीकडे दुर्लक्ष करत असल्याचा प्रश्न ‘सिटी सब मिडिया’ ने लावून धरला होता.

बातमीची दखल आणि तत्काळ कारवाई…

हे वृत्त प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर वणीकरांनी संताप व्यक्त केला होता. याची गंभीर दखल घेत वाहतूक पोलीस विभागाने कोणतीही दिरंगाई न करता ही चौकी रस्त्यावरून बाजूला केली आहे. आता रस्ता मोकळा झाला असून वाहतूक सुरळीत झाली आहे. विशेषतः बस, ट्रक आणि शालेय वाहनांना होणारा अडथळा आता दूर झाला आहे.

पोलीस प्रशासनाचे आभार आणि अपेक्षा…

वाहतूक पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन ‘लगबगीने’ जी कारवाई केली, त्याबद्दल वणीतील नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी दाखवलेली ही तत्परता कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे.

“प्रशासनाने आमची समस्या ऐकून घेतली आणि तत्काळ मार्ग काढला, ही चांगली बाब आहे. मात्र, भविष्यातही अशा तांत्रिक बाबींमुळे लोकांचा जीव धोक्यात येणार नाही, याकडे वाहतूक विभागाने सातत्याने लक्ष द्यावे,” अशी अपेक्षा वणीतील सामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.

‘सिटी हब मिडिया’ नेहमीच जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कटिबद्ध असून, यापुढेही प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवून जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी काम सुरूच राहील.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए