सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभाग क्रमांक ९ चे लोकप्रिय नगरसेवक अब्दुल हफीज उर्फ टापू यांनी सर्व वणीकर जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “नागरिकांना घाण व समस्यांपासून स्वातंत्र्य मिळवून देणे आणि आपला प्रभाग सर्वांग सुंदर बनवणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी याप्रसंगी म्हटले.
नागरिकांच्या सेवेत सदैव तत्पर…
नगरसेवक अब्दुल हफीज हे नेहमी प्रभागातील जनतेच्या थेट संपर्कात असतात. नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रभागातील विविध कामे तातडीने पूर्ण करून घेण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. नगरपरिषदेकडून एखादे काम काही कारणास्तव रखडले किंवा झाले नाही, तर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ते स्वतःच्या खिशातून खर्च करून ती कामे मार्गी लावतात.
स्वखर्चाने बांधून दिली नाली; नागरिकांकडून कौतुक…
नुकतीच प्रभागातील सांडपाण्याची अडचण दूर करण्यासाठी त्यांनी लोकांच्या सोयीसाठी स्वखर्चाने नाली बांधून दिली आहे. त्यांच्या या जनहितैषी कामाचे सर्वत्र कौतुक होत असून, “नगरसेवक असावा तर असा,” अशी भावना प्रभागातील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
प्रभाग सुंदर बनवण्याचा निर्धार…
आपण जनतेच्या नेहमी कामी येत राहावे हीच आपली सदिच्छा असल्याचे सांगत नगरसेवक टापू यांनी वणीकर जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या असून, प्रभाग स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

























