Homeक्राइमवाढदिवसाच्या आदल्याच दिवशी तरुणाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात सोडून...

वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी तरुणाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात सोडून मित्र पसार!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

शहरातील साई नगरी भागात राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाचा स्थानिक हॉटेलमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यश सुगन कोचर असे मृत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, रविवारी यशचा वाढदिवस होता. मात्र, अवघ्या एक दिवसाआधीच काळाने घाला घातल्यामुळे कोचर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लग्नाहून परतल्यानंतर मित्रांसोबत मुक्काम…

मिळालेल्या माहितीनुसार, शेजारीच विवाह सोहळा असल्याने यश शुक्रवारभर लग्नाच्या गडबडीत व्यस्त होता. रात्रीच्या वेळी त्याने स्थानिक एस.बी. लॉन्स येथील स्वागत समारंभालाही हजेरी लावली. तिथून घरी परतल्यानंतर कपडे बदलून तो आपल्या काही मित्रांसह वरोरा रोडवरील हॉटेल ‘आशीर्वाद’ येथे मुक्कामासाठी निघून गेला.

रुग्णालयात आढळला बेवारस मृतदेह…

शनिवारी (१६ मे) सकाळी यशची प्रकृती अचानक बिघडल्याची आणि त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कोचर कुटुंबाला मिळाली. निरोप मिळताच कुटुंबीयांनी ग्रामीण रूग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, तिथे रुग्णालयातील एका खोलीत यशचा मृतदेह अत्यंत बेवारस स्थितीत पडलेला पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलाचा मृतदेह पाहून आईने जागेवरच धास्ती घेतली, तर इतर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

व्हिसेरा राखून ठेवला; डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज…

घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत यशच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमांच्या खुणा आढळून आलेल्या नाहीत. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नसल्याने डॉक्टरांनी रासायनिक परीक्षणासाठी (Viscera) नमुने राखून शासकीय प्रयोगशाळेत पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास स्थानिक मोक्षधाम येथे यशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संशयाची सुई मित्रांकडे; पोलीस तपास सुरू…

यशचा मृत्यू नेमका कसा आणि कोणत्या परिस्थितीत झाला, हे अद्याप गूढ आहे. मात्र, घटनेनंतर त्याच्यासोबत हॉटेलच्या खोलीत थांबलेले दोन ते तीन मित्र अचानक गायब झाल्याने या प्रकरणातील संशय कमालीचा वाढला आहे.

शनिवारी पहाटेच्या सुमारास मित्र यशला आधी एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तिथून डॉक्टरांनी ग्रामीण रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिल्यानंतर त्याला सरकारी दवाखान्यात आणण्यात आले. परंतु, यशचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याचे मित्र मृतदेह रुग्णालयाच्या खोलीतच सोडून तिथून पसार झाले, असा थेट आरोप नातेवाईकांनी केला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून वणी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Video thumbnail
वणीतील ऐतिहासिक वारसा टिकून राहण्यासाठी एबीवीपीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार...
02:16
Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Video thumbnail
निशुल्क जलसेवा श्री महावीर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वणी का उपक्रम…
01:00
Video thumbnail
संधी आणि वेळ आहे, जीवनदायी निर्गुडेला जीवनदान द्या वणीकरांची हाक...
04:08
Video thumbnail
शाम बिहारी का चटपटा चना जोर गरम..,
01:18
Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए