Homeक्राइममृतक भावाची आठवण परत मिळाली, वणी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: अपघातात मृत झालेल्या...

मृतक भावाची आठवण परत मिळाली, वणी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचा हरवलेला मोबाईल ‘CEIR’ तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधला; भावाकडे सुपूर्द!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

अपघातात प्राण गमावलेल्या एका व्यक्तीचा गहाळ झालेला महागडा मोबाईल शोधण्यात वणी पोलिसांना यश आले आहे. सायबर सेल आणि ‘CEIR’ (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) पोर्टलच्या प्रभावी वापरामुळे हा फोन ट्रॅक करण्यात आला. पोलिसांनच्या या कामगिरीमुळे मृत व्यक्तीची शेवटची आठवण त्यांच्या कुटुंबाला सुखरूप परत मिळाली आहे.

नेमकी घटना काय होती?

काही दिवसांपूर्वी वणी येथील जन्नत होटलच्या  परिसरात एक भीषण कार अपघात झाला होता. या अपघातात भीमनगर भागात राहणारे मॅकेनिक  रियाजुद्दीन शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात झाला त्या गोंधळाच्या परिस्थितीत रियाजुद्दीन यांच्या जवळील किमती मोबाईल फोन घटनास्थळावरून गहाळ झाला होता.

भावाच्या मृत्यूनंतर शाकीर उद्दीन रफी उद्दीन यांनी वणी पोलीस ठाण्यात मोबाईल हरविल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसात मिसिंग नोंद क्र. ६९७/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

असा लागला मोबाईलचा छडा…

तांत्रिक कौशल्याचा यशस्वी वापर:

केस दाखल होताच वणी पोलीस स्टेशनच्या CEIR पोर्टल हँडलर महिला पोलीस अंमलदार (LPC) ब.नं. ४९३ छाया उमरे यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. त्यांनी हरवलेल्या मोबाईलचे डिटेल्स केंद्र सरकारच्या ऑनलाईन ‘CEIR’ पोर्टलवर ब्लॉक आणि ट्रेसिंगसाठी नोंदवले.

काही दिवसांतच हा मोबाईल सक्रिय होताच पोर्टलवर त्याचा माग लागला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मोबाईलचा अचूक लोकेशन शोधून तो जप्त केला.

पोलिसांचे मानले आभार…

आज दिनांक २५ मे २०२६ रोजी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाकीर उद्दीन रफी उद्दीन यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा मोबाईल सुपूर्द करण्यात आला.

आपल्या दिवंगत भावाची शेवटची आठवण आणि त्यातील वैयक्तिक डेटा सुरक्षित परत मिळाल्यामुळे भावूक झालेल्या शाकीर उद्दीन यांनी वणी पोलीस प्रशासन आणि महिला पोलीस अंमलदार छाया उमरे यांच्या तत्परतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए