सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
स्वातंत्र्याच्या लढ्यात संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळते, असे मत माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केले. सावरकर जयंतीनिमित्त येथील सावरकर चौकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी सावरकरांनी स्वातंत्र्य संग्रामात दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत, अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांनी देशासाठी संघर्ष सुरू ठेवला. त्यांच्या विचारांमधून राष्ट्रनिष्ठा आणि त्यागाची भावना दिसून येते, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गजानन कासावार यांनी प्रास्ताविकातून सावरकर चौकाच्या सुशोभीकरणाबाबत माहिती देत, चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आकर्षक पोर्ट्रेट उभारण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह दीपक नवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकरराव पावडे, सावरकर जयंती समितीचे प्रमुख संजय दोरखंडे, सुरेश मोरे, अनिल पोटे, सुनील ठाकरे, एकनाथ मांडवकर, डॉ. अनिरुद्ध वैद्य, संतोष इनमुलवार, विशाल झाडे, पुरुषोत्तम आक्केवार, रहीम शेख, सोनू शेख, प्रशांत भालेराव, कवडू पिंपळकर, विशाल काळे, गजानन कौरासे यांच्यासह अनेक सावरकरप्रेमी नागरिक उपस्थित होते.

























