Homeक्राइमवणीत कार डेकोर व्यावसायिकाचे बंद घर फोडले; तब्बल पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास!

वणीत कार डेकोर व्यावसायिकाचे बंद घर फोडले; तब्बल पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

शहरातील विठ्ठलवाडी, वडगाव रोड परिसरात एक मोठी घरफोडीची घटना समोर आली आहे. घरमालक कौटुंबिक कामानिमित्त नागपूरला गेले असता, अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील अलमारीतून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण २,९५,००० रुपयांचा (२ लाख ९५ हजार) मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूरला गेले अन् मागे घर फुटले:

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी येथील रहिवासी आणि व्यवसायाने कारडेकोर असलेले तालिब अयुब खान (वय २८ वर्षे) हे २२ मे २०२४ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून नागपूर येथे गेले होते. दरम्यान, दि. २२ ते ३१ मे या कालावधीत घर बंद असल्याचा फायदा अज्ञात चोरट्याने घेतला. चोरट्याने मुख्य दरवाजाचा कोंडा आणि कुलूप तोडून घरात प्रवेश केला. रविवारी, ३१ मे रोजी दुपारी २ वाजता खान कुटुंबिय परत आले असता, त्यांना घराचा दरवाजा तुटलेला आणि बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. अलमारी तपासली असता चोरीचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

चोरीला गेलेल्या मालाचा तपशील:

चोरट्यांनी कपाटातून जुन्या किमतीप्रमाणे खालील मुद्देमाल चोरून नेला:

सोने (३७ ग्रॅम, किंमत १,८५,००० रुपये): ३ सोन्याच्या अंगठ्या (९ ग्रॅम), एक सोन्याचा गोप (८ ग्रॅम), आणि एक सोन्याचा हार (२० ग्रॅम).

चांदी (५०० ग्रॅम, किंमत ३०,००० रुपये): चांदीचा हार, कानातले २ जोड, जोडवे, ११ जोड चांदीची पायल आणि १ जोड पैंजण.

रोख रक्कम (८०,००० रुपये): यामध्ये ५०० रुपयांच्या १२६ नोटा, १०० रुपयांच्या १३० नोटा, २० रुपयांच्या १०० नोटा, १० रुपयांच्या १०० नोटा आणि १० रुपयांचे १०० शिक्के समाविष्ट होते.

पोलीस तपास सुरू:

या प्रकरणी फिर्यादी तालिब खान यांच्या जबानी रिपोर्टवरून वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३३१ (३), ३३१ (४) आणि ३०५(a) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश वडतकर करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या मोठ्या घरफोडीमुळे परिसरात व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए