HomeAgroवणी नगरपरिषदेत 'मुजोर' राज! पाणी टंचाईने जनता त्रस्त, सत्ताधारी नगरसेविकेनेही टेकले हात;...

वणी नगरपरिषदेत ‘मुजोर’ राज! पाणी टंचाईने जनता त्रस्त, सत्ताधारी नगरसेविकेनेही टेकले हात; मग सामान्य जनतेला वाली कोण?

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण उन्हाच्या तडाख्यामुळे वणी शहरात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. अनेक प्रभागांमध्ये नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, जनतेच्या या समस्येसाठी थेट नगरपरिषदेत धाव घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही येथील मुजोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. सत्ताधारी पक्षाच्याच एका नगरसेविकेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनासमोर हतबल होऊन हात टेकावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने, वणी नगरपरिषदेतील ‘बेबंदशाही’ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

सत्ताधारी नगरसेविकेचे हाल; अधिकाऱ्यांची मुजोरी शिगेला!

शहरातील विविध भागात नळाला पाणी व्यवस्थित येत नसल्याने संतप्त नागरिक आपल्या भागातील नगरसेवकांकडे तक्रारी घेऊन जात आहेत. जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने नगरसेवक आणि नगरसेविका नगरपरिषदेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, येथील मुजोर अधिकारी आणि कर्मचारी लोकप्रतिनिधींच्या मागण्यांना सर्रास डावलत असून, त्यांचे फोन उचलण्याचे सौजन्यही दाखवत नसल्याची माहिती समोर आली आहे.

जेव्हा जेव्हा पाणी पुरवठ्याबाबत विचारणा केली जाते, तेव्हा ‘मोटर दुरुस्तीचे काम सुरू आहे’, ‘आज पाणी सोडतो, उद्या पाणी सोडतो’ अशी खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेली जाते. प्रत्यक्षात मात्र नळ कोरडेच राहत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू आहे.

पाणीपुरवठा सभापतींच्या ‘नाकाखाली’ अनागोंदी!

या संपूर्ण प्रकरणात सर्वात गंभीर आणि विशेष बाब म्हणजे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार यांच्याकडेच पाणीपुरवठा सभापती पदाची जबाबदारी आहे. असे असताना, त्यांच्याच नाकाखाली आणि त्यांच्याच पक्षाच्या सत्ताधारी नगरसेविकेला पाण्याच्या एका थेंबासाठी नगरपरिषदेत मानहानी सहन करावी लागत आहे. जर सत्ताधारी लोकप्रतिनिधींचीच ही अवस्था असेल, तर वणीतील सामान्य जनतेची दखल हे मुजोर अधिकारी आणि कर्मचारी काय घेणार? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

प्रशासक काळ संपला, पण बेबंदशाही कायम!

वणी नगरपरिषदेत प्रशासक राजवटीच्या काळात जी अनागोंदी आणि बेबंदशाही माजली होती, ती जनप्रतिनिधींचे (नगरसेवकांचे) राज्य आल्यानंतर सुतमुळात कमी होईल अशी अपेक्षा वणीकरांना होती. मात्र, लोकनियुक्त प्रतिनिधी आल्यानंतरही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मुजोरी तशीच कायम असल्याचे या घटनेवरून स्पष्ट दिसून येत आहे. प्रशासनावर पदाधिकाऱ्यांचा कुठलाही वचक राहिला नसल्याचे चित्र आहे.

आता पालिकेवर नाही, ‘वरुणेराजा’वरच आशा!

नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे आणि टँकर माफियांच्या कथित साखळीमुळे वणीकरांना आता या पालिकेकडून पाणी मिळण्याची आशा पूर्णपणे मावळली आहे. “आता ही पालिका नाही, तर थेट पावसाळाच वणीतील पाणी टंचाईच्या संकटातून नागरिकांना दिलासा देऊ शकतो,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया वणीतील सर्वसामान्य जनता व्यक्त करत आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Video thumbnail
वणी का नाम दुनिया में रोशन किया! विधी बाजोरिया बनीं पहली महिला पायलट | Success Story...
10:09
Video thumbnail
वणीतील गोंडकालीन ऐतिहासिक विहिरीचे रहस्य! खजुराहो सारख्या दुर्मिळ प्रतिमा | Wani History...
18:23
Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए