HomeAgroगोवंश तस्करीवर वणी पोलिसांचा मोठा प्रहार; पिकअप वाहनासह तिघांना बेड्या, ३ जनावरांची...

गोवंश तस्करीवर वणी पोलिसांचा मोठा प्रहार; पिकअप वाहनासह तिघांना बेड्या, ३ जनावरांची सुटका!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

बेकायदेशीरपणे आणि अत्यंत क्रूरतेने जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका टोळीचा वणी पोलिसांच्या डीबी (गुन्हे शोध) पथकाने पर्दाफाश केला आहे. रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास वाघदरा गावाजवळ (वाघदरा फाटा) पोलिसांनी सापळा रचून ही धडक कारवाई केली. या कारवाईत ३ गोवंशांची (बैल) सुटका करण्यात आली असून, वाहतुकीसाठी वापरलेले बोलेरो पिकअप वाहन जप्त करत तिघांना अटक करण्यात आली आहे.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला प्रकार…

रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास बजरंग दलाचे पदाधिकारी विशाल दूधबळे, रितेश पचारे, दिनेश सालवटकर आणि सुमित निलावार हे काही वैयक्तिक कामानिमित्त वाघदरा परिसरातून वणीच्या दिशेने येत होते. यादरम्यान त्यांना रस्त्यावरून जाणारी एक बोलेरो पिकअप गाडी (क्रमांक MH-32-Q-2624) संशयास्पद वाटली. त्यांनी वाहनाची जवळून पाहणी केली असता, त्यात तीन बैल अत्यंत निर्दयीपणे, आखूड दोऱ्यांनी कोंबून बांधलेले आढळले. जनावरांना हालचालही करता येत नव्हती आणि त्यांच्या खाण्या-पिण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. कार्यकर्त्यांनी तातडीने या घटनेची माहिती वणी पोलिसांना दिली.

वाघदरा फाट्यावर नाकेबंदी आणि कारवाई…

माहिती मिळताच उपनिरीक्षक (उपोनि) साजिद सैय्यद व त्यांच्या डीबी पथकाने तात्काळ हालचाली करत वाघदरा गावाजवळ नाकेबंदी केली आणि संशयास्पद वाहन अडवले. पोलिसांनी वाहनधारकाकडे जनावरांच्या वाहतुकीचा परवाना, पावती किंवा वाहनाची वैध कागदपत्रे मागितली, परंतु त्यांच्याकडे काहीही मिळून आले नाही. सुरुवातीला वाहनातील इसमांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कडक पवित्रा घेत वाहन आणि जनावरे जप्त केली.

पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त; शिरपूर आणि डोर्ली येथील तिघांना अटक…

या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ९० हजार रुपये किमतीचे ३ बैल आणि अंदाजे २ लाख रुपयांची पिकअप गाडी, असा एकूण २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी ज्या तिघांना अटक केली आहे, त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१. दुर्गाप्रसाद ऊर्फ आकाश चरणदास लेंगुळे (चालक – रा. शिरपूर)

२. मोहन रामचंद्र आसोले (रा. डोर्ली)

३. लोकेश उर्फ लुकेश सुरेश पडोले (रा. डोर्ली)

वणी पोलिसांनी या तिन्ही आरोपींविरुद्ध प्राण्यांवर क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध करण्याच्या कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

‘उज्ज्वल गोरक्षण ट्रस्ट’ मध्ये रवानगी:

पोलिसांनी सुटका केलेल्या तिन्ही बैलांना पुढील संगोपन, वैद्यकीय उपचार आणि देखरेखीसाठी वणी येथील ‘उज्ज्वल गोरक्षण ट्रस्ट’ (गोरक्षण संस्था) येथे सुरक्षितपणे सुपूर्द केले आहे.

पोलीस पथकाची कामगिरी…

ही धडक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी आणि वणीचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साजिद सैय्यद व त्यांच्या डीबी पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे वणी परिसरात गोतस्करांचे धाबे दणाणले आहेत. हे बैल कुठून आणले होते आणि कुठे नेले जात होते, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Video thumbnail
City Hub Media is live
00:00
Video thumbnail
वणीतील ऐतिहासिक वारसा टिकून राहण्यासाठी एबीवीपीच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार...
02:16
Video thumbnail
ना जाती ना धर्म सबके लिए है शुद्ध ठंडा पानी... वणी रेल्वे स्टेशनपर कोई भी यात्री प्यासा नहीं रहेगा।
02:17
Video thumbnail
निशुल्क जलसेवा श्री महावीर सेवाभावी बहुउद्देशीय संस्था वणी का उपक्रम…
01:00
Video thumbnail
संधी आणि वेळ आहे, जीवनदायी निर्गुडेला जीवनदान द्या वणीकरांची हाक...
04:08
Video thumbnail
शाम बिहारी का चटपटा चना जोर गरम..,
01:18
Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए