HomeAgro'नमो उद्याना'चा श्रेयवाद विसरले; वणीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आजी-माजी आमदार एकाच...

‘नमो उद्याना’चा श्रेयवाद विसरले; वणीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आजी-माजी आमदार एकाच मंचावर!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

जनतेच्या हितासाठी पक्षाच्या भिंती ओलांडून आजी आमदार संजय देरकर व माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार एकत्र; वणीकरांना दिसले सुखद चित्र…

काही महिन्यांपूर्वीच शहरातील ‘नमो उद्याना’च्या उद्घाटनावरून दोन्ही नेत्यांचे गट आमनेसामने आले होते. एकमेकांच्या समर्थकांनी बॅनरबाजी करत राजकीय श्रेय घेण्यासाठी मोठी चढाओढ लावली होती. त्या वेळचे ते तणावाचे राजकीय वातावरण पाहता, हे दोन्ही नेते एकत्र येतील अशी सुतराम शक्यता नव्हती. मात्र, राजकारण फक्त निवडणुकीपुरतेच मर्यादित असावे, हे दाखवून देत वणी विधानसभा क्षेत्राचे आजी आमदार संजय देरकर आणि माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी काल जुन्या वादावर पडदा टाकला. वणीकरांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र आले, जे वणीकरांसाठी अत्यंत सुखद आणि दिलासादायक चित्र होते.

समितीच्या दौऱ्यात उमटला एकच सूर…

वणी आणि चंद्रपूर परिसरातील वेकोली (WCL) मुळे झालेल्या शेतजमिनींचे नुकसान, पिकांची नासाडी आणि वाढत्या प्रदूषणाच्या समस्येची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गठीत केलेली अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांची एक सदस्यीय समिती वणीमध्ये दाखल झाली होती. या समितीसोबत आसपासच्या गावांमध्ये आणि बाधित परिसरात पाहणी करत असताना दोन्ही नेत्यांचा सूर एकच होता. पक्ष जरी वेगळे असले, तरी वणीची जनता आणि शेतकरी हे आपल्याच कुटुंबातील सदस्य आहेत, याच भावनेने दोन्ही नेत्यांनी अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आणि राज्याचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे खालील मागण्या एकाच ताकदीने लावून धरल्या:

योग्य नुकसान भरपाई: वेकोलीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा आणि जमिनींचा योग्य मोबदला तात्काळ मिळावा.

जमिनीच्या बदल्यात नोकरी: ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलीने संपादित केल्या आहेत, त्यांच्या वारसांना तात्काळ नोकऱ्या मिळाव्यात.

प्रदूषणातून मुक्ती: वणीकर जनता वर्षानुवर्षे कोळशाच्या प्रदूषणामुळे त्रस्त आहे, या प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करण्यात यावी.

रेल्वे सायडिंग हटवा: वणी शहराच्या आरोग्याशी खेळणारी रेल्वे सायडिंग शहरापासून दूर हलवण्यात यावी.

सोफ्यावर शेजारी बसून ऐकल्या जनतेच्या समस्या…

केवळ शेतापातावरच नाही, तर त्यानंतर महसूल विभागात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीतही हे दोन्ही नेते एकाच सोफ्यावर शेजारी बसून होते. अधिकाऱ्यांसमोर वणीकरांच्या समस्या मांडताना आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील, याच्या सूचना करताना दोन्ही नेत्यांमध्ये कमालीचा समन्वय दिसून आला. कालपर्यंत उद्यानाच्या उद्घाटनावरून श्रेयवादाची लढाई लढणारे हेच हात आज शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एकत्र आलेले पाहून उपस्थितही भारावून गेले होते.

“राजकीय मतभेद कितीही असले, तरी वणीच्या आरोग्यासाठी आणि विकासासाठी आमच्यात कोणतेही ‘मनभेद’ नाहीत,” असाच संदेश या दोन्ही नेत्यांनी आपल्या कृतीतून दिला.

वणीकर जनतेतून कौतुकाचा वर्षाव आणि नवा आशावाद…

निवडणुकीच्या पलीकडे जाऊन जनतेसाठी एकत्र येणाऱ्या या ‘वणी पॅटर्न’चे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. “अशीच परिपक्वता भविष्यातही कायम राहावी. कुठल्याही जनहितार्थ किंवा विकासकामात राजकारण आडवे न आणता, वणीचा विकास, प्रदूषणातून मुक्तता आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी हे दोन्ही नेते नेहमी एकत्र काम करतील,” असा दृढ आशावाद आता वणीच्या सामान्य जनतेकडून व्यक्त केला जात आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए