HomeAgroगांधी चौकात दिवसाढवळ्या हातचलाखी; दुचाकीच्या डिकीतून २५ हजारांची रोकड लंपास!

गांधी चौकात दिवसाढवळ्या हातचलाखी; दुचाकीच्या डिकीतून २५ हजारांची रोकड लंपास!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

 सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया…

शहरातील गांधी चौक परिसरात भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दुचाकीच्या डिकीत सुरक्षित ठेवलेली २५ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने क्षणार्धात पळविल्याची घटना समोर आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शेलू (चारगाव) येथील शेतकरी बापूराव भोंगळे (वय ७०) हे काही कामानिमित्त वणी शहरात आले होते. त्यांनी वणी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून २५ हजार रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर त्यांनी ती रक्कम आपल्या मोटारसायकलच्या डिकीत ठेवून गांधी चौक परिसरात खरेदीसाठी थांबले.

यावेळी भाजीपाला खरेदी करण्यात ते गुंतले असताना चोरट्याने संधी साधली. रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या दुचाकीची डिकी उघडून त्यातील संपूर्ण रोकड अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. काही वेळाने परत आल्यावर डिकीतील पैसे गायब असल्याचे लक्षात येताच भोंगळे यांना धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच त्यांनी वणी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. प्राथमिक तपासात हेल्मेट घातलेली एक संशयित व्यक्ती दुचाकीजवळ वावरताना आढळल्याचे समजते. त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर ती वाहनाच्या डिकीत किंवा सहज उपलब्ध ठिकाणी ठेवू नये, तसेच गर्दीच्या भागात वाहन दीर्घकाळ बेवारस सोडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

गांधी चौकासारख्या गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, चोरट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए