सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…
येथील अन्नपूर्णा केटर्सचे संचालक आणि नामांकित व्यावसायिक आदरणीय सुशील मंगीलाल तातेड यांनी वयाची पन्नास वर्षे पूर्ण करून सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त वणी शहर व परिसरातील विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कर्तृत्व आणि समाजसेवेचा आदर्श…

सुशील तातेड यांचे नेतृत्व, व्यावसायिक कर्तृत्व आणि समाजसेवेची प्रेरणा नेहमीच सर्वांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. त्यांनी आपल्या प्रेमळ, नम्र आणि मिलनसार व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या याच दूरदृष्टीमुळे आणि उत्तम आदरातिथ्यामुळे ‘अन्नपूर्णा केटर्स, वणी’ हे नाव आज लग्न समारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम आणि कॉर्पोरेट इव्हेंट्ससाठी गुणवत्तेचा आणि विश्वासाचे प्रतिक बनले आहे. उत्तम चव, उत्कृष्ट सेवा आणि आपुलकीची भावना ही त्यांच्या व्यवसायाची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात.
शुभेच्छांचा वर्षाव…
त्यांच्या या ‘अर्धशतका’निमित्त स्नेही, मित्रपरिवार आणि ग्राहकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. “आपणास उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा! आपण दीर्घायुषी होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” अशा शब्दांत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
सिटी हब मिडिया वणी तर्फे ही सुशीलजी तातेड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂 🎂 🎂 🌷…


























