सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणी तालुक्यातील डोर्ली येथे पाण्याच्या टाकीजवळ बसून असलेल्या बजरंग दलाचे सक्रिय कार्यकर्ते आणि गोरक्षक अक्षय प्रशांत मालेकर वय २८ यांच्यावर चौघांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या हल्ल्यात अक्षय गंभीररीत्या जखमी झाले असून सोबत असलेल्या इतर मजुरांनी तातडीने धाव घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अक्षय मालेकर हे मागील कित्येक वर्षांपासून बजरंग दलाशी जोडलेले असून ते परिसरात गोरक्षणाचे काम सक्रियपणे करतात त्यांनी आजवर अनेकदा गोतस्करी करणाऱ्या गाड्या पकडून दिल्या आहेत या प्रकरणातील संशयित आरोपींचा थेट संबंध गोतस्करीशी जोडला जात असून त्यांच्यावर आधीपासूनच विविध पोलीस ठाण्यांमध्ये गोतस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपूर्वीच आरोपींची गोतस्करी करणारी एक गाडी अक्षय मालेकर यांनी इतर गोरक्षकांसोबत मिळून पकडली होती आणि याप्रकरणी पोलिसांत तक्रारही नोंदवली होती या कारवाईमुळे चिडलेले आरोपी सतत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना धमकावत होते आणि त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून होते या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडून मागील काही दिवसांत एकमेकांविरोधात तक्रारी देखील दाखल झाल्या होत्या…
आज दिनांक १४ जुलै २०२६ ला मंगळवारी सकाळी १०.३० वाजता अक्षय हे ग्राम डोर्ली येथील पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या कामावर बिल्डींग मटेरिअल सप्लायर शुमभ आकिनवार यांच्या टाटा एस गाडीचे चालक म्हणून गेले होते. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ते मजुरांसह पाण्याच्या टाकीजवळ बसलेले असताना आरोपींनी अक्षय यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला आरोपींनी जुन्या कारवाईचा राग मनात धरून तुम्ही वणी येथे गौतस्करीच्या गाड्या पकडून देता असा उल्लेख करत अक्षय यांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाले तिथे उपस्थित असलेल्या इतर मजुरांनी प्रसंगावधान राखून तात्काळ धाव घेतल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली आणि अक्षय यांचा जीव वाचला मजुरांना पुढे येताना पाहून आरोपी तेथून पळून गेले…
या प्रकरणी अक्षय मालेकर यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी भोलाराम सुरेश पडोळे वय ३२, लुकेश सुरेश पडोळे वय २७ ,आदित्य रामचंद्र आस्वले वय २०, तिघे राहणार डोर्ली आणि आकाश लेनगुरे वय ३० राहणार शिरपूर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ ३५२ आणि ३ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत…
(बातमीत एआई इमेज वापरली आहे…)

























