HomeAgroगौरक्षकांवर जीवघेणे हल्ले अन् धमक्या! तेलंगणा सीमेवरील गौतस्करीच्या बदलत्या पॅटर्नमुळे पोलीस आणि...

गौरक्षकांवर जीवघेणे हल्ले अन् धमक्या! तेलंगणा सीमेवरील गौतस्करीच्या बदलत्या पॅटर्नमुळे पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांसमोर नवीन आव्हान!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

गौतस्करीचा बदलता पॅटर्न: आता हिंदू नावांचे आरोपी; हिंदुत्ववादी संघटना आणि पोलिसांसमोर नवीन आव्हान…

 महाराष्ट्र राज्यात गौतस्करी आणि अवैध गोवंश वाहतुकीचा पॅटर्न वेगाने बदलत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. पूर्वी या गुन्ह्यांमध्ये केवळ एका विशिष्ट समुदायाचीच माणसे मोठ्या प्रमाणात सामील असायची आणि त्यामुळे अनेकदा सांप्रदायिक तणावाचे वातावरण निर्माण व्हायचे. मात्र, गेल्या काही महिन्यांत झालेल्या पोलीस कारवाया आणि दाखल झालेल्या एफआयआर (FIR) मधील ठळक नावे पाहता, आता हिंदू धर्मातील व्यक्तींची संख्या या अवैध व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.

विशेषतः “वरोरा, मुकुटबन, शिरपूर, आणि झरी”  तालुक्यातील तेलंगणा सीमेला लागून असलेल्या गावांमधील काही हिंदू मंडळी या अवैध गौतस्करीच्या साखळीत सामील असल्याची दाट शक्यता हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केली आहे. या भागातील गोवंश दलालांचा सुळसुळाट झाला असून, ते पैशांच्या आमिषाने स्थानिक तरुणांना या जाळ्यात ओढत आहेत. ‘गोमाता’ आणि ‘बैल हा शेतकऱ्याचा मित्र’ ही पारंपरिक संकल्पना मोडीत निघताना दिसत आहे.

१४ जुलै: डोर्ली येथील हल्ला आणि वाढता तणाव…

हा बदलता पॅटर्न केवळ आर्थिकच नाही तर हिंसक रूपही धारण करत आहे. १४ जुलै रोजी डोर्ली गावात गौरक्षक अक्षय मालेकर यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला हा गौतस्करी रोखण्याच्या रागातूनच करण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे. गौवंशाने भरलेली वाहने पकडणे आणि तस्करांवर कारवाई करणे यांसारख्या कृत्यांमुळे गौरक्षकांवर हल्ला करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यानंतर गौरक्षकांमध्ये आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

हिंदुत्ववादी संघटनांना धमक्या…

गौतस्करीच्या वाढत्या प्रमाणामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना सतत धमक्या दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. अवैध गौवंश वाहतूक रोखण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कार्यकर्त्यांना टार्गेट केले जात असून, त्यांच्यावर हल्ले होण्याची भीती व्यक्त केली जात आहे,तरीही ते गौतस्करी रोखण्यासाठी कटिबद्ध आहेत.

मकोका लावण्याची ताकीद आणि प्रशासनाचा कडक पवित्रा…

महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा कडकपणे लागू आहे आणि गोवंश हत्या हा गंभीर अपराध आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौहत्या आणि अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर थेट ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची ताकीद दिली आहे. या कडक कायद्यानंतरही केवळ पैशांच्या हव्यासापोटी या अवैध व्यवसायात हिंदू आरोपींची संख्या वाढताना दिसत आहे.

संघटनांचा पवित्रा स्पष्ट: कोणताही धर्म असो, सोडले जाणार नाही…

या बदलत्या पॅटर्ननंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट आणि आक्रमक केली आहे. “विश्व हिंदू परिषद, बजरंग दल”यांसारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी आता पोलिसांच्या मदतीने कंबर कसली असून, त्यांनी एक नवा निर्धार व्यक्त केला आहे. गौवंशाची अवैध वाहतूक किंवा कत्तल करणारा गुन्हेगार हा केवळ गुन्हेगार असतो, त्याला कोणताही धर्म नसतो. पकडला गेलेला व्यक्ती कोणत्याही धर्माचा असो त्याला अजिबात सोडले जाणार नाही. पोलिसांच्या मदतीने अशा प्रत्येकावर कडक कायदेशीर कारवाई करून न्यायालयाकडून शिक्षा मिळवून दिली जाईल, असे संघटनांनी स्पष्ट केले आहे.

या बदलत्या गुन्हेगारी पॅटर्नमुळे आता हा लढा केवळ दोन समुदायांमधील धार्मिक वाद न राहता, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्धचा थेट संघर्ष बनला आहे. पोलीस प्रशासन आणि जागरूक संघटना आता कोणत्याही दबावाला बळी न पडता अशा सर्व टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. डोर्ली येथील हल्ला आणि कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रशासन आणि पोलिसांनी याकडे गंभीरपणे लक्ष देऊन योग्य कारवाई करणे आवश्यक आहे.

(बातमीत एआई इमेज वापरली आहे…)

 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए