Homeमहाराष्ट्रवणीतील ऐतिहासिक जंगल सत्याग्रहाला अभिवादन; स्वातंत्र्यवीरांच्या शौर्याला उजाळा!

वणीतील ऐतिहासिक जंगल सत्याग्रहाला अभिवादन; स्वातंत्र्यवीरांच्या शौर्याला उजाळा!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान देणाऱ्या वणी येथील ऐतिहासिक जंगल सत्याग्रहाच्या स्मृतींना ४ ऑगस्ट रोजी भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. ४ ऑगस्ट १९३० रोजी पार पडलेल्या या आंदोलनाच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभास माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तालुका संघचालक हरिहर भागवत, अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार, विवेक पांडे तसेच सुनील इंदुवामन ठाकरे यांनी पुष्पगुच्छ व हार अर्पण करून आदरांजली वाहिली.

वणी परिसरातील स्वातंत्र्यसंग्रामात जंगल सत्याग्रहाचा अध्याय सुवर्णक्षरांनी लिहिला गेला आहे. लोकनायक पद्मविभूषण डॉ. बापूजी अणे यांच्या प्रेरणेतून या लढ्याला बळ मिळाले. या आंदोलनाचे प्रत्यक्ष नेतृत्व वणीचे स्व. रा. गं. भागवत आणि चंद्रपूरचे डॉ. शंकरराव वैद्य यांनी केले होते. या ऐतिहासिक लढ्यात वणी तालुका काँग्रेस कमिटीचे तत्कालीन प्रमुख स्व. रवी करंदीकर (वकील) यांच्यासह डॉ. या. श्री. अणे, भ. रा. सास्तीकर आणि गो. मु. अनुरकर यांसारख्या दिग्गजांनी महत्त्वाची धुरा सांभाळली होती.

या सत्याग्रहात दा. प्र. किटकुले, जयरामपंत इंगोळे, शामरावजी पांडे, नरसुजी ढवळे, व. पां. सैनिस, दौलतराव कळसकार, शंकरराव मारोटकर, बापुराव कापर्तीवार, नारायणराव उपाध्ये, प्रल्हादपंत देशपांडे, मु. वि. देशपांडे, नत्थुजी पानसरे, त्रिंबकराव देशपांडे, सत्यनारायण मिश्रा, मोहनलाल चोपडा, रा. ना. वैद्य, पां. का. पाटील, ग. कृ. ठाकरे, वसंतराव क्षीरसागर, यादवराव कमाविसदार, वामनराव देशपांडे, शंकरराव देशपांडे, माधवराव, कृष्णराव नागदेव, सांबशिव वंगाले आणि शंकरराव मगरे यांसारख्या अनेक सैनिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.

या जाज्वल्य इतिहासाची स्मृती कायम ठेवण्यासाठी वणी तालुका स्वातंत्र्यसंग्राम सैनिक समितीने एक स्मृतिस्तंभ उभारला. ४ ऑगस्ट १९९२ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले होते. त्या वेळी ना. रा. भागवत, ब. ना. बोनगीरवार यांच्यासह समितीचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीरांचा हा त्याग आणि बलिदान पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. अभिवादनादरम्यान उपस्थितांनी या योद्ध्यांच्या देशभक्तीचे स्मरण केले. हा समृद्ध इतिहास आणि वारसा जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी डॉ. जिनेंद्र भंडारी, सागर जाधव आणि अंकुश भंडारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए