Homeक्राइमयवतमाळ जिल्ह्यातील खाकीची धाडसी मोहीम: पांढरकवडा परिसरातील ६० लाखांच्या दरोड्याचा छडा; पुणे...

यवतमाळ जिल्ह्यातील खाकीची धाडसी मोहीम: पांढरकवडा परिसरातील ६० लाखांच्या दरोड्याचा छडा; पुणे कनेक्शन उघड, तिघांना बेड्या!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

धडक कारवाया, तांत्रिक कौशल्याचा वापर आणि तब्बल सात पथकांची अहोरात्र धावपळ… यवतमाळ पोलीस दलाने दाखवलेल्या या तडफदार कामगिरीमुळे पांढरकवडा परिसराला हादरवून सोडणाऱ्या कोट्यवधींच्या दरोड्याचा अवघ्या काही दिवसांत उलगडा झाला आहे. पुण्याहून आलेल्या अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी वाहनासह तब्बल ६० लाख १० हजार ८०२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

त्या दोन रात्री अन् खळबळजनक दरोडा…

केळापूर तालुक्यातील मोहदा परिसरात जुलै महिन्याच्या मध्यात चोरट्यांनी दहशत माजवली होती. १४ जुलै २०२६ च्या रात्री मोहदा ते मेटीखेडा रस्त्यावर मजुरी काम करणारे रवींद्र मंगल कांबळे (वय ३०) यांना सात जणांच्या टोळक्याने रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रक्कम आणि ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा ४४,३०० रुपयांचा ऐवज हिसकावून चोरटे पसार झाले.

ही  घटना ताजी असतानाच, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ जुलै २०२६ च्या मध्यरात्री दरोडेखोरांनी ‘राजेन्द्र ज्वेलर्स’चे मालक राजेन्द्र श्रीमल वर्मा (वय ६१) यांचे दुकान लक्ष्य केले. दुकानाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे अमूल्य दागिने आणि रोकड असा तब्बल ९७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून चोरट्यांनी पोलिसांना उघडे आव्हान दिले होते.

‘खाकी’ ॲक्शन मोडमध्ये: पुण्यापर्यंत शोधमोहीम!

घटनेचे गांभीर्य ओळखून यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. आरोपींना शोधण्यासाठी पोलीस दलाची तब्बल ७ विशेष पथके तयार करण्यात आली.

तपासाचे चक्र वेगाने फिरत असताना पोलिसांच्या सायबर व तांत्रिक टीमला महत्त्वाचा सुगावा लागला गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन थेट पुण्यातील असल्याचे निष्पन्न झाले! तत्काळ पथकाने पुण्याकडे कूच केले आणि चाकण येथून विशाल रघु कुंभार (वय २५) याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आपल्या खास शैलीत कसून चौकशी करताच विशाल पोपटासारखा बोलू लागला आणि त्याच्या इतर साथीदारांची नावे समोर आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सौरपशी उर्फ सौरसिंग राजकुमार राठोड (वय ३४, रा. शिक्रापूर) आणि अभिमन्यू अलसिंग राठोड (वय ३८, रा. डाळिंब, जि. पुणे) या दोघांच्याही आवळल्या.

६० लाखांचा ऐवज जप्त, उर्वरित आरोपींचा शोध सुरू…

ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली महागडी चारचाकी गाडी असा एकूण ६०,१०,८०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील उर्वरित पसार आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके अजूनही आहेत.

या ‘रियल हिरों’ची धडक कामगिरी…

ही मोठी कामगिरी यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल आणि सतिश चवरे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कार / सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तसेच प्रत्यक्ष कारवाईत पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार लहू ताबरे, सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी श्रीमती यशोधरा मुनेश्वर, शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, धिरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, सागर इंगळे, शिवशंकर कायंदे, अमोल राठोड, पांढरकवडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, उमरखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे आणि एलसीबी, सायबर, पांढरकवडा, शिरपूर व उमरखेड पोलीस ठाण्यातील अंमलदारांनी नोंदवला.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए