Homeमहाराष्ट्ररोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात चिखलगावच्या श्री...

रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात चिखलगावच्या श्री रामदेव बाबा मुकबधीर विद्यालयाला डिजिटल क्लासरूमची अनोखी भेट!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या रोटरी वर्ष २०२६-२७ च्या पदग्रहण सोहळ्याला सामाजिक उपक्रमाची जोड देत यंदाचा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. शनिवार, ८ ऑगस्ट रोजी एस.बी. हॉल येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात रोटेरियन अश्विनकुमार कोंडावार यांनी अध्यक्षपदाची, तर रोटेरियन अचल जोबनपुत्रा यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली.

या सोहळ्याचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीतर्फे चिखलगाव येथील श्री रामदेव बाबा मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक डिजिटल क्लासरूमची निर्मिती करण्यात आली. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावी, सुलभ आणि आनंददायी शिक्षण मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

मान्यवरांच्या उपस्थितीत पदग्रहण…

कार्यक्रमाला Rtn. निलेश परतानी (DGN 3030) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आमदार संजयभाऊ देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार, वणी नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ. विद्याती अत्राम, तसेच Rtn. डॉ. संदीप मुडे आणि Rtn. निखिल केडिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा पार पडला. तसेच रोटरीच्या कार्याशी जोडल्या गेलेल्या नवीन सदस्यांचे स्वागत करून त्यांचा रोटरी परिवारात समावेश करण्यात आला.

अश्विनकुमार कोंडावार यांच्या संकल्पनेतून डिजिटल क्लासरूम…

नवनिर्वाचित अध्यक्ष अश्विनकुमार कोंडावार यांच्या संकल्पनेतून चिखलगावच्या श्री रामदेव बाबा मूकबधिर विद्यालयात डिजिटल क्लासरूम साकारण्यात आली. या वर्गात विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शैक्षणिक साहित्य उपलब्ध होणार असून, पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक दृकश्राव्य आणि समजण्यास सोपे व्हावे, तसेच त्यांच्यातील शैक्षणिक क्षमता विकसित होण्यास मदत व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

‘Create Lasting Impact’चा सकारात्मक संदेश…

रोटरीच्या ‘Create Lasting Impact’ या संकल्पनेला अनुसरून शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात हा उपक्रम राबविण्यात आला. केवळ पदग्रहणाचा सोहळा न करता समाजातील गरजू घटकांसाठी उपयुक्त ठरेल, असा उपक्रम राबवून रोटरी क्लबने सामाजिक कार्याची दिशा अधोरेखित केली.

माजी अध्यक्ष Rtn. लवलेश लाल आणि माजी मानद सचिव Rtn. गौरव जोबनपुत्रा यांच्या कार्यकाळात सुरू झालेली समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

पदग्रहण सोहळ्यास रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदग्रहणासोबतच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डिजिटल क्लासरूमची दिलेली भेट ही या सोहळ्याची विशेष आकर्षण ठरली.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए