सुनिल तुगनायत,सिटी हब मिडिया वणी…
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वणी नगराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, वणी येथे भारतमाता पूजनाचा कार्यक्रम साधेपणाने व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नगराध्यक्ष चैतन्यजी तुरविले, वणीचे नगरमंत्री अंकित भालेराव, नमन रावणहत्ते, प्रतीक बोंडे, योग अत्राम, विधान फुलेवार, अविनाश बोडे, योगिनी खारकर, वैष्णवी बर्डे, यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान परिसरातील अनेक नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी होत भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन केले. नागरिकांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करणारा हा साधा, शिस्तबद्ध आणि भावपूर्ण उपक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वणी नगराच्या वतीने पार पडला.

























