Homeक्राइमधक्कादायक! 'iPhone 16 Pro' हवा म्हणून नातवाने घरातच टाकला दरोडा; ५२ ग्रॅम...

धक्कादायक! ‘iPhone 16 Pro’ हवा म्हणून नातवाने घरातच टाकला दरोडा; ५२ ग्रॅम सोन्याची चोरी, वणी पोलिसांच्या ‘डीबी’ पथकाची सर्जिकल स्ट्राईक!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

महागड्या ‘आयफोन’च्या नादात नातवानेच मारला आजोबांच्या दागिन्यांवर डल्ला; वणी पोलिसांकडून ६.७२ लाखांच्या घरफोडीचा छडा…

हातात महागडा ‘आयफोन १६ प्रो’ मिरवण्याच्या हव्यासापोटी एका अल्पवयीन नातवाने आपल्याच सख्ख्या आजोबांच्या घरातील तब्बल पावणेसात लाखांचे सोन्याचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात स्थानिक डी.बी. पथकाने कारवाई करत एका अल्पवयीन बालकासह त्याच्या मित्राला जेरबंद केले असून, संपूर्ण ५२ ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

कनकवाडी येथील रहिवासी बंडू विठोबा बोढाले (वय ६२) यांच्या राहत्या घरातून २० ते २१ ऑगस्टच्या रात्री कपाटाची तिजोरी उघडून ६ लाख ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. याप्रकरणी १ सप्टेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

अशी उघडकीस आली चोरी…

पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक (डी.बी. पथक) समांतर तपास करत असताना, संविधान चौक परिसरात संशयितांची हालचाल टिपण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून विठ्ठलवाडी येथील गुणवंत ऊर्फ पोलार्ड पांडुरंग दानव (वय २३) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. खाक्या दाखवून चौकशी करताच धक्कादायक कट समोर आला.

सदर अल्पवयीन मुलाला ‘आयफोन १६ प्रो’ खरेदी करण्याची तीव्र इच्छा होती. त्याने ही बाब मित्र गुणवंत आणि सुरज हुसेन गेडाम (वय २५, रा. दहेगाव विरखुंड) यांना सांगितली. या दोघांनी त्याला थेट स्वतःच्याच आजोबांच्या घरातील सोन्यावर डल्ला मारण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार नातवाने चावीने आजोबांचे लोखंडी कपाट उघडून सोन्याचे दागिने चोरले.

विक्रीसाठी पळण्याच्या तयारीत असताना बेड्या…

चोरी केलेले सोने विकण्यासाठी हे आरोपी चंद्रपूर अथवा नागपूरकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी २ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास त्यांना संविधान चौकातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २५ ग्रॅमचा चपलाकंठी हार, दोन गोप (१५ ग्रॅम व ५ ग्रॅम) आणि कानातील टॉप्स असे एकूण ५२ ग्रॅम वजनाचे ६ लाख ७२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी सुरज गेडाम सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सदर यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार भानुदास पिदूरकर, डी.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सय्यद साजिद, हवालदार गजानन सावसाकडे, अंमलदार गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, मोनेश्वर खांदरे आणि रितेश भोयर यांनी पार पाडली.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए