Homeक्राइमप्रभाग १३ मध्ये जेसीबीची मोठी कारवाई! जुने शौचालय भुईसपाट जनतेच्या त्रासाला पूर्णविराम!...

प्रभाग १३ मध्ये जेसीबीची मोठी कारवाई! जुने शौचालय भुईसपाट जनतेच्या त्रासाला पूर्णविराम! नगरसेवक सैफुर रहमान यांनी करून दाखवले!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

जागेवर लहान मुलांसाठी खेळणी व ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था होणार: काँग्रेस नगरसेवकांचे आश्वासन… प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली गंभीर डोकेदुखी अखेर कायमची संपली आहे. या प्रभागातील अनेक वर्षांपासून बंद असलेले, दुर्गंधीचे आगार बनलेले जुने सार्वजनिक शौचालय नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवक सैफुर रहमान यांच्या विशेष पुढाकारामुळे पालिकेतर्फे जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे भुईसपाट करण्यात आले. या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत सुटकेचा निश्वास सोडला आहे.

अनेक वर्षांची नरकयातना संपली…

प्रभागातील हे शौचालय गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत धूळ खात पडून होते. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत होती आणि डुकरांचा मुक्त संचार वाढला होता. घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते तसेच साथीचे आजार पसरण्याची सतत भीती निर्माण झाली होती. परिसरातील रहिवाशांचे जगणे अक्षरशः मुश्किल झाले होते. स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते.

नगरसेवकांचा प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा…

प्रभाग क्रमांक १३ मधून नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सैफुर रहमान यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेतले. त्यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे वारंवार भेटी देऊन निवेदने सादर केली आणि ठोस कारवाईसाठी सातत्यपूर्ण तगादा लावला. त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश आले असून पालिकेच्या पथकाने तातडीने जेसीबी आणून ही जुनी आणि धोकादायक इमारत पूर्णपणे जमीनदोस्त केली.

नागरिकांकडून आभार व समाधान…

“अनेक वर्षांपासून प्रशासनाने दुर्लक्ष केलेली आमची ही मोठी समस्या नगरसेवक सैफुर रहमान यांच्या सक्रियतेमुळे अवघ्या काही दिवसांत मार्गी लागली,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. आता दुर्गंधीचा त्रास कायमचा संपला असून लहान मुले मोकळेपणाने खेळू शकतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

रिकाम्या जागेचा होणार सुशोभीकरण…

शौचालयाची इमारत पाडल्यानंतर मोकळ्या झालेल्या या जागेचा वापर परिसराच्या विकासासाठी करण्यात येणार आहे. येथे लहान मुलांसाठी सुंदर खेळणी आणि ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे (बेंच) बसवण्याचा विचार असल्याचे प्रभाग क्रमांक १३ चे काँग्रेस नगरसेवक सैफुर रहमान व नगरसेविका अलकाताई मोखाडे यांनी स्पष्ट केले आहे. या आश्वासनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए