सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
दीपावलीच्या तेजोमय पर्वावर शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य आणि चंद्रपूरच्या इतिहासात एकाच महिन्यात २ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवणारी एकमेव शैक्षणिक संस्था ‘सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स’तर्फे सर्व विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक सदिच्छा देण्यात आल्या आहेत. हे प्रकाशपर्व सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि उज्ज्वल यश घेऊन येवो, अशी मंगलमय प्रार्थना संस्थेचे चेअरमन श्री. पी. एस. आंबटकर आणि व्हाईस चेअरमन श्री. पी. पी. आंबटकर यांनी केली आहे.
केवळ शिक्षण नाही, तर सर्वांगीण विकासाची हमी: ‘मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी’, वणी… सोमय्या ग्रुप अंतर्गत कार्यरत असलेली वणी येथील टिळक चौकातील ‘मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी’ ही सीबीएसई (CBSE) संलग्न शाळा (प्ले ग्रुप ते १० वी) गुणवत्तेचे नवे मापदंड प्रस्थापित करत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या या शाळेत अत्याधुनिक शिक्षण पद्धती, प्रशिक्षित व अनुभवी शिक्षकवृंद, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, सीसीटीव्ही सुरक्षित परिसर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो.
तांत्रिक, वैद्यकीय आणि व्यावसायिक शिक्षणाचा मोठा विस्तार…
सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सने विदर्भातील विद्यार्थ्यांना एकाच छताखाली विविध अभ्यासक्रमांची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे:
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान (B.Tech & Diploma): एरोनॉटिकल, कॉम्प्युटर सायन्स, एआयएमएल (AIML), डेटा सायन्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मायनिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग.
वैद्यकीय व आरोग्य सेवा (Medical & Pharmacy): बी.ए.एम.एस. (BAMS – आयुर्वेद), बी.फार्म, डी.फार्म तसेच बी.एस्सी. नर्सिंग (B.Sc. Nursing) अभ्यासक्रम (चंद्रपूर, भद्रावती व सावित्रीदेवी कॉलेज, वणी).
शालेय, कनिष्ठ महाविद्यालय व आयटीआय: मॅकरून ज्युनियर सायन्स कॉलेज, पॅरामाऊंट कॉन्व्हेंट हायस्कूल, तसेच चंद्रपूर, भद्रावती आणि वणी येथील आयटीआय (ITI) केंद्र.
शिक्षणाची ही अखंड ज्योत अशीच तेवत राहो आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्याला नवी दिशा मिळो, या संकल्पासह संस्थेने समस्त जनतेला दीपावली व आगामी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी संपर्क (वणी): टिळक चौक, वणी | मो. ९८००००७३६१
मुख्य कार्यालय: सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर | मो. ९८००००२७१५, ८६८६८८१०००

























