२० जुलै ला दिपक चौपाटी परिसरातील मच्छी विक्रेता मारोती अर्जुन भानारकर यांची मोटरसायकल क्रं(MH29-CC1367) अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती,व याबाबत भानारकर यांनी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखलकेली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एकव्यक्ती अंदाजे वय २५ वर्षे चोरी केलेली बाईक घेऊन जाताना दिसला व चोरीच्या घटनेपूर्वीची फुटेज पोलिसांनीतपासली व आरोपीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची विचारपूस केली असता त्याने त्या संशयित इसमाचे नावशेखर असल्याचे सांगितले व शेखरने त्याच्याकडे बजाज प्लॉटिना बाईक क्र.(MH35-Z-4194) पाच हजाररूपयात गहाण ठेवली असल्याची माहिती पोलिसांना दिली…
पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास केल्यावर बाईक चोर आरोपीचे नाव चंद्रकांत ऊर्फ शेखर कुटारकार वय २५ वर्षेरा.गव्हा(कोल्ही) तालुका समुद्रपूर जि.वर्धा असल्याचे समजले व पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या गावीशिफातीने अटक केली व चोरी झालेली बाईक क्र.(MH29-CC-1367) ही जप्त केली…
पोलिसांनी आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने गहाण ठेवलेली बजाज प्लॉटिना बाईक ही बुटीबोरीयेथून चोरी केली असल्याची कबुली दिली व बुटीबोरी पोलिसांनी ही बाईक चोरीला दुजोरा देत तक्रार नोंदवलीअसल्याची माहिती दिली…
वणी पोलिसांनी दोन्ही बाईक वणी व बुटीबोरी येथील अंदाजे किंमत (७०हजार हिरो स्पेलंडर आणि ४० हजार, बजाज प्लॅटिना) एकूण १,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे…

सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक कुमार चिंता,
पोलिस अधीक्षक थोरात आणि उपविभागीय पोलिस अधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदारगोपाळ उंबरकर, डी.बी.पथकातील पोलिस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने,पो.हे.कॉ.अमोल दांडगे,हे.कॉ.मोहम्मदवसीम,मोनेश्वर खंडरे,गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, गजानन कुडमेथे सर्व वणी पोलिस स्टेशनयांनी पार पाडली….
वणी पोलिसांच्या तत्पर कारवाई साठी त्यांचे अभिनंदन…

























