पंजाबमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे हजारो कुटुंबांचे घरे, शेती व दैनंदिन जीवन उद्ध्वस्त झाले आहे. या आपत्तीग्रस्त बांधवांना मदत पोहोचविण्याच्या उद्देशाने ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) वणी व यवतमाळ युनिटच्या वतीने “मदतीचा हात” हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या उपक्रमाअंतर्गत वणी, मारेगाव, यवतमाळ शहर व संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांकडून आर्थिक सहाय्य, जीवनावश्यक वस्तू आणि शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आले आहे.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये जिल्हाप्रमुख कॉ. अथर्व निवडिंग, राजिक शेख, तेजस दुमोरे, प्रेम ठेंगणे, अयान शाह, भूषण गणवीर, अथर्व जाधव, जय गिरी, प्रथम डोळस, सुजल पवार, रिंकीता आत्राम, देविका शेंडे, सृष्टी, दिपक जाधव आदींनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला.
हा उपक्रम आदर्श महाविद्यालय वणी, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी, पंचशील हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय नांदेपेरा, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मारेगाव, आदर्श हायस्कूल मारेगाव, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय मारेगाव तसेच वणी बसस्टॉप परिसरात आणि यवतमाळ शहरात राबविण्यात आला.
AISF च्या कार्यकर्त्यांनी “संकटाच्या प्रसंगी समाजाने एकत्र येऊन मदतीचा हात द्यावा” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला आहे. या उपक्रमामुळे पंजाबमधील पूरग्रस्तांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

























