महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते राजू उंबरकर यांच्या मातोश्री सुनंदा मधुकरराव उंबरकर (वय ८५) यांचे गुरुवार, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने उंबरकर परिवारासह संपूर्ण वणी शहरात शोककळा पसरली आहे.
स्व. सुनंदा उंबरकर या शांत, संयमी आणि धर्माभिमानी स्वभावाच्या होत्या. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि सुसंस्कारांनी संपूर्ण परिवाराला एकत्र ठेवत समाजात आदर्श निर्माण केला. राजू उंबरकर यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यामागे त्यांचा दृढ पाठिंबा आणि प्रेरणा होती.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच वणीतील राजकीय, सामाजिक, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अनेक मान्यवरांनी उंबरकर परिवाराला भेट देऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
स्व. सुनंदा उंबरकर यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे आणि आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व साधेपणा, आपुलकी आणि समाजभावनेने परिपूर्ण होते. त्यांच्या आठवणींनी वणी शहरातील नागरिकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केले आहे.
सिटी हब मिडिया तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

























