Homeमहाराष्ट्रसंजय खाडे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस आक्रमक — शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन...

संजय खाडे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस आक्रमक — शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन…

-

[gtranslate]

Advertisementspot_img

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेस आक्रमक — शासनाला तातडीने निर्णय घेण्याची मागणी

 

वणी, ता. 27 ऑक्टोबर:

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर होत चाललेल्या समस्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसतर्फे वणी तहसील कार्यालयात आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या वेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

खाडे यांनी सांगितले की, “कापूस व सोयाबीन हे विदर्भातील शेतकऱ्यांचे मुख्य पिक आहे. मात्र शासनाच्या निर्णयातील विलंब आणि ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेतील अडचणींमुळे अनेक शेतकरी सीसीआय व नाफेडच्या खरेदी नोंदणीपासून वंचित राहत आहेत. शासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.”

 

काँग्रेसने प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या मांडल्या —

 

1. सीसीआय कापूस खरेदी नोंदणीसाठी तात्काळ मुदतवाढ द्यावी.

 

 

2. मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे.

 

 

3. नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी नोंदणी प्रक्रिया तातडीने सुरू करावी.

 

 

 

काँग्रेसने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट सुविधेचा अभाव असल्याने ऑनलाइन नोंदणी करताना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच मार्डी परिसरात खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना लांब अंतरावर जाऊन उत्पादन विकावे लागत असून, त्याचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

 

दरम्यान, नाफेडकडून सोयाबीन खरेदीची प्रक्रिया अद्याप सुरु नसल्याने बाजारात शेतकऱ्यांना अत्यल्प दर मिळत आहेत. त्यामुळे शासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून तत्काळ नोंदणी सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

 

निवेदन सादर करताना पुरुषोत्तम आवारी, अशोक चिकटे, राजू अंकतवार, प्रफुल्ल उपरे, प्रमोद वासेकर, प्रमोद लोणारे, सुधीर खंडाळकर, कैलास पचारे, पलाश बोंडे, महादेव पडोळे, एस. पेंदोर, विप्लव तेलतुंबडे, प्रेमनाथ मंगाम, अनंता डंभारे, नरेंद्र चिकटे, दिनेश पाहुनकर, सुनील वरारकर, प्रशांत गोहोकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

📰 City Hub Media

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए